रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- तालुक्यातील मारवड गावात अवैध गावठी दारू विक्रीचा धंदा उघडपणे सुरू असून, स्थानिक पोलिस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याची जोरदार चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.
गावातील जुन्या सेंट्रल बँकेजवळ गेल्या अनेक दिवसांपासून अवैध गावठी दारू विक्री सुरू आहे. ही विक्री सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असते, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या ठिकाणी येणाऱ्या-जानाऱ्या संशयित लोकांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे परिसरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातील तरुण पिढी या गैरप्रकाराकडे आकर्षित होत असल्याने त्यांच्या भवितव्यावरही मोठे संकट ओढावले आहे. काही तरुण व्यसनाधीन झाल्याचे चित्र समोर येत आहे. तरीदेखील पोलिस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.