अमळनेर / प्रतिनिधी खानसाहब
अमळनेर: लेखक हरिश्चंद्र कढरे यांच्या ‘मातंगाची शौर्य गाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी, २८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील जी. एस. हायस्कूलच्या ग्लोबल लायन क्लब हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रताप महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. विजय तुंटे, सामाजिक चळवळीचे अभ्यासक व नेते बापूसाहेब प्रा.अशोक पवार, माजी गटशिक्षणाधिकारी आयु.अशोक बिऱ्हाडे आणि प्रा.डॉ.मारोती गायकवाड चोपडा डॉ.माधव वाघमारे नंदुरबार उपस्थित होते.
प्रस्तुत मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
पुस्तक प्रकाशन सोहळा पूर्व छत्रपती शिवाजी महाराज, लहुजी वस्ताद साळवे,महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तदनंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ-हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.प्रस्तुत पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी प्रा.डॉ.मोरोती गायकवाड(चोपडा),.उपासनी साहेब,आयु.अशोक बिऱ्हाडे साहेब,श्री.गोकुळ पाटील यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा.विजय तुंटे यांनी आपल्या पुस्तकाच्या अभिप्राय संबंधी म्हटले की, हे पुस्तक वैचारिक व ऐतिहासिक स्वरूपाचे आहे,मातंग समाजाच्या शौर्याची अभंग गाथा या पुस्तकामुळे वाचकांपुढे आली आहे,प्रत्यक्ष निरीक्षण व सहभागातून ग्रंथाचे लेखन झाले आहे.
ज्ञान संपादनासाठी आपण इतिहासाचे अध्ययन करणे आवश्यक आहे.
आपल्या वैचारिक प्रेरणा व जाणिवेचे स्रोत डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आहेत अशी वैचारिक भूमिका स्पष्ट केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा.अशोक पवार यांनी लेखकाचे अभिनंदन करून ‘संविधान जागर’ संबधी मूलभूत स्वरूपाचे विचार यावेळी व्यक्त केले.
या प्रसंगी बन्सीलाल भागवत,आबासाहेब भटू पाटील,मुख्याध्यापक एम ए पाटील,राजेंद्र चव्हाण,जितेंद्र कढरे,प्रविण शिरसाठ,सुनिल गरुड,डॉ.राजीव कांबळे, अवचिते,गौरव कढरे,ललित पाटील,गिरीश बेहेरे,शंकर कांबळे,डॉ.अमित पाटील,ग्रंथपाल दिपक पाटील,उपप्राचार्य डॉ.एच डी जाधव,प्रा.ज्ञानेश्वर कांबळे,डॉ.रवी बाळसकर,डॉ.बालाजी कांबळे, डॉ.माधव वाघमारे, प्रा.यादव बोयेवार,डॉ.डी डी कर्दपवार,प्रा.गोपाळ पाचवणे,अरुण सोनूमोरे,डॉ.संजीव मुसळे,राजू पाटील,कुलकर्णी साहेब,मैराळे साहेब,एस टी पाटील,उज्वल पाटील, गुलाब शिरसाठ,रामकृष्ण पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक संजय पाटील यांनी केले.प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राजेंद्र चव्हाण यांनी केले तर आभार दयाराम पाटील यांनी मानले.याप्रसंगी 60 पेक्षा अधिक साहित्यिक, वाचक,मित्र परिवार,प्राध्यापक,नातेवाईक आणि मान्यवर उपस्थित होते.