Sunday, August 31, 2025
Sunday, August 31, 2025
Sunday, August 31, 2025
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeUncategorizedमहसूल सप्ताह अंतर्गत गणेश भामरे यांचा उत्कृष्ट पोलिस पाटील पुरस्काराने सन्मान.

महसूल सप्ताह अंतर्गत गणेश भामरे यांचा उत्कृष्ट पोलिस पाटील पुरस्काराने सन्मान.

अमळनेर:- तालुक्यातील महसूल सप्ताह अंतर्गत उत्कृष्ट पोलिस पाटील म्हणून काम करणाऱ्या ब्राह्मणे ता.अमळनेर येथील गणेश भामरे पाटील यांचा प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या हस्ते ५ रोजी चोपडा येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी अमळनेर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार प्रशांत धमके, अजय कुलकर्णी, डी.आर.सौंदाणे, आर.आर ढोले यांच्या सह अमळनेर प्रांत कार्यालय अंतर्गत सर्व अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, क्लार्क, ग्राम महसूल सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेश भामरे यांनी बाम्हणे परिसरातील वाळू चोरी रोखण्यासाठी विविध उपाययोजना करत कर्तव्य पार पाडले असून बाम्हणे फाट्यावर लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी धुळे – जळगाव जिल्ह्याच्या तपासणी नाक्यावर ग्रामस्थांच्या मदतीने महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.गावात निर्माण झालेल्या तणावाच्या विविध प्रसंगी सामंजस्याची भूमिका घेत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवली यामुळे बाम्हणे गावाने तंटामुक्त गाव म्हणून जिल्हास्तरीय २ रा क्रमांक पटकाविला.निवडणूक काळात गावात आदर्श मतदान केंद्र तयार केले.
गावातील ग्रामस्थांची सुरक्षितता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले.गणेश भामरे यांनी सामाजिक कामासोबतच सहकाराला बळकट करण्यासाठी गावातील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदाची धुरा देखील यशस्वीपणे सांभाळली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील, खासदार स्मिताताई वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील तसेच सामाजिक व राजकीय स्तरातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular