अमळनेर:- तालुक्यातील मंगळ ग्रह हे वर्ष श्री मंगळ ग्रहाच्या प्रभावाचे वर्ष आहे. श्री मंगळ ग्रहा च्या प्रभावाच्या वर्षी मंगळवारी मंगळ जन्मोत्सव येणे याला महामंगल योग म्हणतात. हा योग दर २७ वर्षांनी येतो, हे विशेष…!
येथील श्री मंगळ ग्रह मंदिराच्या पुनर्जिर्णोद्धारास प्रारंभ झाल्यानंतर प्रथमच हा योग येत आहे. त्यानिमित्ताने २९ व ३१ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर या तीन दिवसांचे भरगच्च व भव्य धार्मिक कार्यक्रम आणि अन्य उपक्रम मंगळ ग्रह सेवा संस्थेने हाती घेतले आहेत. हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १० रोजी दुपारी चार वाजता श्री मंगळ ग्रह मंदिर येथे बैठक होणार आहे. ज्या भाविकांना सदर कार्यक्रमात व उपक्रमांमध्ये स्वयंसेवक तथा सेवेकरी म्हणून सेवा द्यायची असेल त्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.