अमळनेर :- येथील श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता येथील ख्यातनाम श्री मंगळ ग्रह मंदिरात दर वर्षी प्रमाणे दर सोमवारी मंगळेश्वर शिवलिंगावरती रुद्राभिषेक करण्यात येतो. २८ रोजीच्या पहिल्या श्रावण सोमवारी प्रताप महाविद्यालयातील हेड क्लार्क.
भटू रमेश चौधरी सपत्नीक पूजेचे मानकरी होते. भक्तिमय व चैतन्यमय वातावरणात गणपती पूजन करून महादेवांचा अभिषेक करण्यात आला. मंदिराचे पुरोहित यतीन जोशी मेहुल कुलकर्णी आणि वैभव लोकाक्षी यांनी पौराहित्य केले. महाआरती करून रुद्राभिषेकाची सांगता झाली.
यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डीगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, उज्वला शहा, बाळा पवार तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.