अमळनेर : धार्मिकतेसोबतच सामाजिक जाणिवेचे उचित भान राखत येथील मंगळग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन, धनवाडी व आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १७ रोजी मोफत मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. अमळनेरसह , धुळे,चोपडा, यांसह परिसरातील विविध खेड्यापाड्यातील ६२ पेक्षा अधिक रुग्णांनी सहभाग नोंदविला.
पैकी १४ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरल्याने त्यांना तत्काळ पनवेल येथे शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. मंगळग्रह सेवा संस्था नेहमीच केवळ अध्यात्मिकच नव्हे तर अनेकविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोफत मोतीबिंदू शिबिराचे आयोजन केले होते.
सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचा प्रारंभ झाला. आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. चंदन चौधरी, डॉ. राहुल चौधरी, डॉ राहुल पाटील, डॉ भूपेंद्र वाघ यांनी उपस्थित रुग्णांची तपासणी केली. शिबिर संयोजक प्रशांत कोळी, किरण भाई, सागर धनगर आणि यांनी सहकार्य केले. शिबिरात शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या १४ रुग्णांना आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल येथे तत्काळ वाहनाद्वारे रवाना करण्यात आले.
मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव यांच्यासह मंदिरातील सेवेकरी उपस्थित होते. मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांनी सूत्रसंचालन केले.
यशस्वीतेसाठी जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, रवींद्र मोरे, रजनीकांत पाटील, लीनेश खैरनार, तेजस अहिराव, मयूर चौधरी, नितेश बारी, निखिल सूर्यवंशी, हरिश चव्हाण, प्रमोद पाटील आदींनी सहकार्य केले.