आ. अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून बहुप्रतिक्षित पिपंरी फाटा – मंगरूळ–जुनोना रस्त्याचे भूमिपूजन उत्साहात.
यावल / रावेर शब्बीर खान (प्रतिनीधी )
दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर पिपंरी फाटा मंगरूळ ते जुनोना रोड या प्रमुख ग्रामीण रस्त्याच्या विकासकामाचे भूमिपूजन आज महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडवणीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उत्साहात पार पडले. अनेक वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थांची ही प्रमुख मागणी होती. आजच्या या भूमिपूजनामुळे ग्रामस्थांच्या अपेक्षांना मूर्त स्वरूप आले आहे.
या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. खड्ड्यांनी भरलेल्या या मार्गामुळे परिसरातील लोकांना दैनंदिन प्रवासात प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते. शेतमाल वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता, तसेच विद्यार्थ्यांना शाळा-कोलेजसाठी जाणे अवघड बनले होते. हा रस्ता परिसरातील जीवनवाहिनी ठरणार आहे.
या रस्त्यास मंजुरी मिळवण्यासाठी माजी खासदार व आमदार स्व. हरिभाऊ जावळे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. मात्र निधी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात काम रखडले होते. त्यानंतर आमदार मा. अमोलभाऊ जावळे यांनी हा मुद्दा शासन दरबारी जोरकसपणे मांडत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश येत रस्त्यास आवश्यक निधी मंजूर झाला आणि आज या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.
या भूमिपूजन सोहळ्यास गावकरी व पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या प्रसंगी सुरेश धनके, पद्माकर महाजन, गोमती बारेला, पी. के. महाजन, अमोल पाटील, संदीप सावळे, हरलाल कोळी, महेश पाटील, चंदू पाटील, संजू पाटील, राजन लासूरकर, वासू नरवाडे, सुनील पाटील, रवी पाटील, सूर्यकांत देशमुख, विजय महाजन, स्वप्नील सोनवणे, कैलास पाटील, विजय पाटील, अशोक पाटील, सोपान भिलाला, अनंता महाजन, प्रमोद वानखेडे, मधुकर पवार यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामविकासाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल भविष्यातील अनेक योजना आणि पायाभूत सुविधांना चालना देईल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. आज झालेल्या भूमिपूजन सोहळ्याला गावकरी, पदाधिकारी, महिला व युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट जाणवत होता.
“सामान्य माणसाच्या अडचणीला केंद्रस्थानी ठेवून काम करणे, हाच माझा संकल्प आहे”, असे प्रतिपादन आमदार अमोलभाऊ जावळे यांनी यावेळी केले.