Chopda – Staff Reporter
भारतीय जैन संघटनाने रोटीचे नव्हे तर रोजीचे काम केले आहे. जैन संघटना सामजिक संस्था आहे परंतु आज पर्यंत एकही डाग नसलेली संस्था म्हणजे भारतीय जैन संघटना होय. ही संघटना म्हणजे महाराष्ट्राचा दागिना होय तो दागिना आता संपूर्ण भारतात नावलौकिक करत आहे.असे गौरव उदगार येथील आनंदराज पॅलेसच्या हॉल मध्ये भारतीय जैन संघटनाचे जळगाव जिल्हा व तालुक्याचे पद्ग्रहण सोहळ्यात व युवा उद्योगजक पुरस्कार वितरण कार्यक्रमात माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते
ते पुढे म्हणाले की, भारतीय जैन संघटनांचे कार्य निस्वार्थी आहे फक्त एक टक्का जण संख्या असलेला हा समाज टेक्स भरण्यात मात्र 30 ते 40 % टेक्स भरण्यासाठी पुढे असतो. ज्या ठिकाणी पोस्टमन,पोलीस, राजनेता असे पोहचले नाही अश्या ठिकाणी राजस्थानातून आलेला हा समाज छोटं छोट्या पाड्यात जाऊन बसला होता. आणि तिथे ग्रामिण जनतेला राशन उपलब्ध करून देत होता. हीच शिकवण जैन समाजा कडून घेण्या सारखी आहे. त्याच तत्वावर भारतीय जैन संघटना सुरू आहे. जैन समाजात “क्षमा विरस्य भूषणम्” चूक असली आणि नसली तरी मला माफ करा असे नम्रतेने वागणारा जैन समाज होय. माफीला सुद्धा सण समजणारा समाजाकडून अनेक बाबी ह्या शिकण्या सारख्या आहेत.
सुरवातीला स्वागत गीत अंकिता दर्डा तर नवकार महामंत्रचा जाप योगिता चोपडा यांनी सादर केले भारतीय जैन संघटना शाखा चोपडा कडून आलेल्या मान्यवराचे स्वागत शाल व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आले.यावेळी मंचावर राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमारजी साखला, राष्ट्रीय सचिव दीपकजी चोपडा, राज्य अध्यक्ष केतनजी शहा, राज्य उपाध्यक्ष विनयजी पारख,राज्य सचिव प्रविनजी पारख, विभागिय अध्यक्ष प्रा.चंद्रकांत जी डागा, विभागीय सचिव ………… राखेचा, जळगाव जिल्हा अध्यक्ष निर्मल बोरा, सचिव दर्शन देशलहारा, जिल्हा महिला सचिव तृप्ती संचेती, चोपडा तालुका अध्यक्ष माधुरी बरडीया
चोपडा तालुका अध्यक्ष गौरव कोचर, सचिव मयंक बरडीया, आदी उपस्थित होते.
- गुगल बाबाने ज्ञान तर दिले परंतु संस्कार हिसकावून घेतले — नंदकिशोरजी साखला
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, राजनीती,व्यापारनीती, समाजनीती, परिवारनीति सर्वच बदलत आहे. परिवार नितीत संस्कार लोप पावत चालले आहेत त्यामुळे परिवार विभक्त होत आहेत नव्हे तर वैवाहिक सुध्दा टिकाविणे मुश्कील झाले आहे. आधुनिक पिढीत लहानपणा पासूनच मोबाईल हातात आल्याने गुगल वर त्यांना पाहिजे ते त्यांना मिळते. परंतु ह्या गुगल बाबाने (मोबाइल) संस्काराचा हार्स करणे लावले आहे त्यासाठी भारतीय जैन संघटनाने मूल्यवर्धनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.स्मार्टगर्ल कार्यक्रम,युवकाचे सशक्तीकरणं कार्यक्रम, मातृवंदना, पितृवंदना,अश्या विविध कार्यक्रमात परिवाराची जडणघडण केली तर नक्किच संस्काराचा हार्स होणार नाही. हे दाव्याने भारतीय जैन संघटना सांगू शकते.
यावेळी राष्ट्रीय सचिव दीपकजी चोपडा, राज्य अध्यक्ष केतनजी शहा, प्रवीणजी पारख, प्रा.चंद्रकांतजी डागा,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच यावेळी जिल्हा कार्यकारणी, जिल्हा महिला कार्यकारणी,तालुका कार्यकारणी,तालुका महिला कार्यकारणी यांना दीपक चोपडा यांनी शपथ दिली.तर युवा उद्योगजक म्हणून रुपेश पाटोल, आदित्य अग्रवाल, बापू महाजन,निपुण गुजराथी,कुशल भुरड,प्रदीपसिंग राजपुरोहित यांना मान्यवरांचा हस्ते प्रदान करण्यात आले. याकार्यक्रमासाठी संपुर्ण जिल्हाभरातून पदाधिकारी आलेले होते. कार्यक्रमासाठी पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, व्हाईस चेअरमन सुनील भुरड, सदस्य नेमीचंदजी कोचर,चोसाकाचे माजी चेअरमन ऍड घनश्याम आण्णा पाटील, डॉ.निर्मलजी टाटीया, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गिरीश आप्पा पाटील, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते तिलकचंद शहा संघपती सुभाषचंद्रजी बरडीया आदी शेकडो मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चोपडा भारतीय जैन संघटना, महिला संघटनाचे सदस्यांनी मेहनत घेतली.