रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- सध्या महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने मुस्लिम समाजाला लक्ष करत राजकारण सुरू केले असल्याचा आरोप होत आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्यातील सर्व नगरपरिषद, महानगरपालिका, पंचायत समित्यांना आदेश दिले आहेत की त्यांनी मुस्लिम समाजातील व्यक्तींच्या जन्म प्रमाणपत्रांची तपासणी करावी. यामुळे स्थानिक प्रशासनावर ताण निर्माण झाला आहे.
नगरपालिकांमध्ये सध्या मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज करत आहेत. मात्र, पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे या विभागांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे या मोहिमेमुळे कामकाजावर परिणाम होत आहे.
प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की, किरीट सोमय्या यांना महाराष्ट्रात फक्त मुस्लिम समाजच का दिसतो? राज्यात अनेक जाती-धर्मांचे लोक आहेत. मात्र, भाजपाची लक्ष वेधून घेण्याची ही पद्धत का? मुस्लिम समाजाला सतत संशयाच्या नजरेने पाहणे योग्य आहे का?
मुस्लिम समाजातील नागरिकांनी देखील येथे शांत राहून विचार करण्याची गरज आहे. घरातील एका व्यक्तीचा किंवा आजोबांचा जन्म दाखला पुरेसा पुरावा ठरू शकतो. सर्व कुटुंबाचे जन्म प्रमाणपत्र असणे आवश्यक नाही. नागरिकांनी भीती न बाळगता, आपल्या अधिकारांबद्दल जागरूक राहावे. भारताच्या संविधानानुसार, जोपर्यंत तुमचे पूर्वज इथलेच आहेत, तोपर्यंत कोणीही तुम्हाला देशाबाहेर काढू शकत नाही.