कडक आणि तत्परतेने कारवाईची मागणी.
अमळनेर :- जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे घडलेल्या तरुण सुलेमान खान यांच्या मॉब लिंचिंगच्या घटनेविरोधात अमळनेर येथे मुस्लिम समाजाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात घटनेतील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, “सुलेमान खान यांचा मृत्यू हा केवळ एका तरुणाच्या जीवावरच बेतलेला नाही, तर समाजातील सलोखा, बंधुता आणि संविधानिक मूल्यांवर गंभीर आघात करणारा आहे.”
मागण्यांमध्ये सर्व आरोपींना तात्काळ अटक करणे, मास्टरमाईंड शोधून कठोर शिक्षा देणे, पीडित कुटुंबास आर्थिक मदत व सरकारी नोकरीची तरतूद करणे तसेच धार्मिक उन्माद पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा समावेश आहे.
निवेदन देताना नसीर हाजी, फिरोज मिस्री, मौलाना रियाज़ शेख, शेखा हाजी, गुलाम नबी, शेख नविद, इमरान शेख कादर, सैय्यद अजहर अली, ॲड. शकील काजी, अहमद सैयद, जमालोद्दीन, जुबेर पठान, मुशीर शेख, जावेद खान, काशीफ अली, अलीमोद्दीन शेख, शाहरुख बागवान यांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणाऱ्या अशा अमानुष घटनांना आळा बसावा आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली.