रिपोर्टर नूरखान
अमळनेर (प्रतिनिधी) – खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय येथे प्रा. डॉ. हर्षवर्धन जाधव यांची प्रभारी प्राचार्य म्हणून ३ सप्टेंबर २०२५ पासून नियुक्ती करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अरुण बी. जैन हे ३१ मार्च २०२५ रोजी वयोमर्यादा पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
या नवीन नियुक्तीबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सीए. नीरज अग्रवाल, ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब वाणी, विनोदभैय्या पाटील, डॉ. अनिल शिंदे, योगेशभैय्या मुंदडे, कल्याणबापू पाटील, प्रदीप अग्रवाल, चिटणीस प्रा. पराग पाटील, माजी प्राचार्य डॉ. ए. बी. जैन, शिक्षक प्रतिनिधी प्रा. दिनेश भलकार, तसेच महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व ग्रंथपाल यांनी प्रा. डॉ. जाधव यांचे हार्दिक स्वागत व अभिनंदन केले.
या प्रसंगी डॉ. जे. बी. पटवर्धन, डॉ. विजय तुंटे, डॉ. धीरज वैष्णव, डॉ. अमित पाटील, डॉ. निलेश चित्ते, डॉ. कल्पना पाटील, डॉ. नलिनी पाटील, डॉ. धनंजय चौधरी, डॉ. आर. सी. सरवदे, डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. माधव भुसनर, डॉ. योगेश तोरवणे, डॉ. रवी बाळसकर, डॉ. मुकेश भोळे, डॉ. विवेक बडगुजर, डॉ. ज्ञानेश्वर मराठे, डॉ. प्रमोद चौधरी, प्रा. विजय साळुंखे, डॉ. किरण गावित, प्रा. शशिकांत जोशी, प्रा. वैशाली राठोड, प्रा. वैशाली महाजन, प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, डॉ. विलास गावित, प्रा. रोहन गायकवाड, डॉ. अनिल झळके, डॉ. बालाजी कांबळे, डॉ. सुनिल राजपूत, प्रा. जयेश साळवे यांच्यासह महाविद्यालयाच्या सर्व विभागांतील अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच उपग्रंथपाल नरेश सातपुते, प्रशांत देवकाते, कुलसचिव राकेश निळे, कार्यालयीन अधिक्षक देवेंद्र कांबळे, अजय साटोटे, कमलाकर पाटील, योगेश बोरसे, संदीप बिऱ्हाडे, ओम गोसावी, विजय जाधव, संदीप सोनवणे, धनराज मोरे, पवन शर्मा, संदेश शर्मा, चंद्रकांत ठाकूर, चंद्रकांत पाटील, बाळा राजपूत, सुधाकर कोळी आदींनीही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.