रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- शहरासाठी प्रकाशित करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्यावतीने करण्यात आला आहे. याबाबत त्यांनी निवडणूक प्रशासनाकडे औपचारिक हरकत नोंदवली असून, तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे.
शहरातील प्रारूप मतदार यादीचे निरीक्षण करताना काही नविन नावे चुकीने समाविष्ट करण्यात आली असून, अनेक जुने आणि पात्र मतदार वगळण्यात आले आहेत, तसेच काही नावे डुप्लिकेट स्वरूपात नोंदवली गेली असल्याचे निदर्शनास आले आहे.
या त्रुटीमुळे मतदार यादीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निवडणुकीच्या पारदर्शकतेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे, असे मत पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रा. अशोक पवार, डी. एम. पपिड, प्रशांत निकम,जाकिर शेख, वासुदेव पवार,महेंद्र पवार, आदी उपस्थित होते.
प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन शुद्ध व दुरुस्त मतदार यादी तातडीने प्रसिद्ध करावी, तसेच ती यादी निरीक्षणासाठी पक्षाला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.