प्रवेश देता का प्रवेश….अन्यथा शाळेला कुलूप लाऊ, अशा तीव्र भावना
मोठे वाघोदा येथे इ. ११ वी प्रवेशासाठी महिला पालकांचा विद्यालयावर मोर्चा.
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
महाराष्ट्र शासनाने सन २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यामध्ये इ. ११ वी साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु केल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिलेले आहे, मोठे वाघोदे येथे मुलींना शिक्षणासाठी बाहेर जाता येत नसल्यामुळे शाळेत विज्ञान शाखा सुरु करण्यात आलेली होती, परंतु आता ज्या मुलींसाठी वर्ग सुरु करण्यात आले त्याच मुली मेरीट लिस्टमुळे प्रवेशापासून वंचित राहत आहेत. दोन फे-या पूर्ण झालेल्या असून आता तिस-या फेरीची प्रक्रिया सुरु झालेली असून तिस-या फेरीत प्रवेश मिळाला नाही तर आमची मुले-मुली प्रवेशापासून वंचित राहतात कि काय? अशी भिती पालकांकडून व्यक्त होत आहे.प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज, मोठे वाघोदे येथे सुद्धा आज २५-३० महिला पालकांचा मोर्चा विद्यालयात आला होता, त्यामध्ये मुला-मुलींच्या काळजीपोटी व मोलमजूरी करण्या-या पालकांची अर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आम्ही आमच्या पाल्यांना शिक्षणासाठी लांब पाठवू शकत नाही, आमच्या पाल्यांना इ. ११ वी मध्ये प्रवेश द्या अन्यथा आम्ही येथेच ठिय्या आंदोलन करु व वेळप्रसंगी शाळेला कुलूप लाऊ, अशा तीव्र भावना पालकांच्या होत्या व ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेवर पालकांनी रोष व्यक्त केला, संस्थेचे सचिव किशोर जगन्नाथ पाटील यांनी तातडीने विद्यालयात येऊन पालकांना समजावले व आपल्या विद्यालयातून १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रवेश करुन घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करु असे आश्वासन पालकांना दिले, विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पालकांना शांत राहण्याचे आवाहन केले.
श