Thursday, July 31, 2025
Thursday, July 31, 2025
Thursday, July 31, 2025
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeMarathiप्रताप महाविद्यालय येथे प्रशासकीय सेवा एक उत्तम करियर - योगेश पाटील यांचे...

प्रताप महाविद्यालय येथे प्रशासकीय सेवा एक उत्तम करियर – योगेश पाटील यांचे प्रतिपादन.

अमळनेर / प्रतिनिधी

यशस्वी अधिकारी विद्यार्थ्यांच्या भेटीस- प्रेरणादायी व्याख्यान संपन्न . उत्कर्ष खान्देशी अधिकारी मंडळाची वारी UPSC ची यात विशेष सहकार्य
करियर कौन्सेलिंग सेंटर, पूज्य साने गुरुजी मोफत वाचनालय केंद्र यांचा संयुक्त उपक्रम.

अमळनेर : येथील करियर कौन्सेलिंग सेंटर, प्रताप कॉलेज, अमळनेर आणि पूज्य साने गुरुजी मोफत वाचनालय केंद्र,अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वारी UPSC ची या उपक्रमअंतर्गत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करण्यासाठी UPSC (IRMS) उत्तीर्ण योगेश पाटील हे या वेळी उपस्थित होते प्रताप महाविद्यालयातील पूज्य साने गुरुजी सभागृहात .

२८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता प्रस्तुत कार्यक्रम संपन्न झाले. प्रस्तुत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन हे होते. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शकांचा परिचय वारी UPSC चे समन्वयक श्री.विजयसिंग पवार यांनी केले. या प्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.एच.डी.जाधव, रेक्टर डॉ. अमित पाटील, घनश्याम पाटील, सौ.नितुताई पाटील, डॉ.विजय तुंटे आदी उपस्थित होते. प्रस्तुत कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांनी उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना सतत प्रयत्नशील राहण्याचे व सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे महत्त्व सांगितले.विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबद्दल जागरूकता निर्माण करणे व योग्य दिशा देणे या उद्देशाने प्रताप महाविद्यालय मध्ये एक दिवसीय संघ लोकसेवा आयोगा (UPSC) वर मार्गदर्शन सेमिनाराचे आयोजन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना घनश्याम पाटील यांनी कठोर परिश्रम, शिस्त याकडे लक्ष द्यावे आणि समाजमाध्यमांचा वापर टाळावे असे सांगितले
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. योगेश पाटील (IRMS अधिकारी) (AIR-811) उपस्थित होते. त्यांनी प्रस्तुत कार्यक्रमात संघ लोकसेवा आयोग (UPSC) याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
प्रस्तुत समारंभाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले श्री. योगेश पाटील हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. ते मूळचे एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले असूनही त्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर यशस्वी कारकीर्द घडवली आहे. त्यांचे शिक्षण अभियांत्रिकी शाखेत झाले असून त्यांनी NIT नागपूर येथून आपले अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
आपल्या चार वर्षांच्या अथक अभ्यासाच्या बळावर त्यांनी UPSC परीक्षेत 811 वा क्रमांक मिळवून यश संपादन केले. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या मामांचे मार्गदर्शन, आई-वडिलांचे पाठबळ आणि गुरूजनांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे. त्यांच्या यशाची कहाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून त्यांनी आपल्या व्याख्यानातून अनेकांना स्पर्धा परीक्षांबद्दल नवीन ऊर्जा दिली.
योगेश पाटील यांनी आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना अभ्यासाची योग्य दिशा, नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स दिल्या. आपल्या भाषणात मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींवर भर दिले. स्वतःच्या मनाला विचारा, आपल्याला हे क्षेत्र खरोखर आवडते का ? हे सर्वप्रथम ठरवा. धैर्य आणि कठोर परिश्रम- यश काही दिवसात मिळत नाही, त्यासाठी सातत्याने मेहनत घेणे आवश्यक आहे.
नेतृत्व विकसित करा- प्रशासकीय सेवांसाठी नेतृत्व क्षमता अनिवार्य आहे.स्व-अनुशासन (Self-Discipline)- दररोजचा अभ्यास, वेळेचे नियोजन, आणि नियमित सराव यावर भर द्या.सर्व प्रकारचे प्रयत्न- चांगले स्टडी मटेरियल शोधा, अभ्यासक्रम समजून घ्या आणि गेल्या १० वर्ष्यांच्या पूर्व परीक्षांचे प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवा..सोशल मीडियापासून दूर रहा- सोशल मीडियाचा अतिरेक टाळून अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.
लेखन कौशल्य विकसित करा- मुख्य परीक्षेमध्ये उत्तम उत्तरलेखन महत्त्वाचे असते, त्यासाठी नियमित लेखन सराव करा.मोठे स्वप्न पहा आणि कृती करा- स्वप्न पाहणं पुरेसं नाही, त्या दिशेने कृती केली तरच यश मिळते.
प्रस्तुत कार्यक्रमास उपस्थित उपप्राचार्य प्रा. डॉ. एच. डी. जाधव , पदार्थविज्ञान विभाग प्रमुख व वसतिगृह प्रमुख प्रा. डॉ. अमित पाटील , प्रा. डॉ. डी आर चौधरी, प्रा. डॉ. आर एस बाळस्कर, प्रा. वृषाली वाकडे, प्रा. बालाजी कांबळे, डॉ.प्रियंका पाटील, प्रा.डी.जी. तडवी, डॉ. राखी घरटे ,प्रा. सचिन आवटे, डॉ. आकाश गव्हाणे, प्रा. एस.के.नेरकर, प्रा. सोनूसिंग पाटील, प्रा.अमोल अहिरे, प्रा.हिमांशु गोसावी, सीसीएमसीचे कर्मचारी दिलीप दादा शिरसाठ, पराग पाटील, अतुल धनगर, विशाल अहिरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक, सी.सी.एम.सी. विभागाचे समन्वयक तथा राज्यशास्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. व्ही. एस. तूंटे यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचे आभार राज्यशास्त्र विभागातील डॉ. हर्ष नेतकर यांनी मानले.याप्रसंगी 135 विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular