रिपोर्टर नूरखान
अमळनेर : प्रताप महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल अशा स्टुडंट मोबाईल ऍप’चे उद्घाटन दिनांक १८ सप्टेंबर रोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमावेळी सॉफ्टवेअर कंपनीचे प्रतिनिधी राहुल शिंदे, IQAC समन्वयक डॉ. मुकेश भोळे, परीक्षा नियंत्रक प्रा. शशिकांत जोशी, तसेच परीक्षा समितीचे सदस्य प्रा. अमोल मानके, प्रा. एस. डी. बागूल, प्रा. किरण गावित, प्रा. योगेश तोरवणे, तसेच योगेश बोरसे, अजय साटोटे, नितीन राजपूत, रोहित ठाकूर आदी उपस्थित होते.
सॉफ्टवेअर कंपनीच्या प्रतिनिधींनी MKCL द्वारे विकसित करण्यात आलेल्या स्टुडंट ऍपची माहिती दिली. या ऍपद्वारे विद्यार्थ्यांना तासिका, अभ्यासक्रम, परीक्षा तसेच महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती मिळणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांचा विचार करून हे आधुनिक आणि उपयुक्त मोबाईल ऍप लवकरच वापरासाठी उपलब्ध करून दिले जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.