विद्यार्थ्यांचे स्टॅचू अनावरण व जुदो प्रात्यक्षिकांची मोहक सादरीकरणे.
अमळनेर, दि. २९ ऑगस्ट (प्रतिनिधी) – नूरखान
प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथे क्रीडा विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.शि. मंडळाचे मा. सचिव व उपप्राचार्य प्रा. पराग पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. एच. डी. जाधव, प्रा. कल्पना पाटील, डॉ. योगेश तोरवणे, डॉ. डी. आर. चौधरी, डॉ. नलिनी पाटील, डॉ. अमोल मानके, प्रा. अवीत पाटील, डॉ. रवि मराठे, प्रा. जयेश साळवे, प्रा. अर्चना पाटील यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रतिमेचे पूजन व विद्यार्थ्यांच्या स्टॅचूचे अनावरण करून करण्यात आली. नंतर जुदो खेळातील विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण सादरीकरण करीत उपस्थितांची मने जिंकली.
प्रा. एच. डी. जाधव यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील संधी व शिस्त याविषयी मार्गदर्शन केले. विद्यापीठ अधिसभा सदस्य आणि जिमखाना समन्वयक डॉ. एस. बी. नेरकर यांनी आपल्या मनोगतातून क्रीडा दिनाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमात विद्यापीठ पातळीवर खेळलेल्या गुणवंत खेळाडूंचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय बॅडमिंटन, बुद्धिबळ व मास रेसलिंग या स्पर्धांचा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा संचालक डॉ. सचिन पाटील, जुदो प्रशिक्षक श्री. सचिन वाघ आणि श्री. प्रशांत देवकते यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अवीत पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सचिन पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय क्रीडा विभागातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.