अमळनेर :- येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात थोर वैज्ञानिक डॉ.प्रफुल्लचंद्र रे यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय रसायनशास्त्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते.
प्रा.डॉ.जयेश गुजराथी (माजी उपप्राचार्य, IQAC समन्वयक व माजी विभागप्रमुख रसायनशास्त्र) हे होते.
प्रा. डॉ. गुजराथी यांनी आपल्या व्याख्यानात आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय यांच्या वैज्ञानिक संशोधन कार्यावर आणि त्यांच्या सामाजिक योगदानावर सखोल प्रकाश टाकले. “ रसायनशास्त्र हा केवळ सूत्रांचा विषय नसून समाज बदलण्याची शक्ती असलेली भाषा आहे ,” असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. “हे शास्त्र केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून ते समाज घडवणारी एक प्रेरणा आहे,” शास्त्रज्ञ प्रफुलचंद्र रे यांचे शोध,संशोधन,ग्रंथ संपदा,पुरस्कार हे आज महत्वपूर्ण आहेत,असे अभ्यासपूर्ण विचार डॉ.जयेश गुजराथी यांनी विद्यार्थ्यांपुढे मांडले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा.डॉ. निलेश शांताराम पवार (विभागप्रमुख, रसायनशास्त्र विभाग) यांनी भूषविले.
याप्रसंगी प्रास्ताविक डॉ.अमोल मानके यांनी केले. त्यांनी आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय यांच्यावर आधारित जीवनपट विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून सादर केला, जो सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
प्रस्तुत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रसायनशास्त्र विभागातील डॉ मिलिंद ठाकरे, डॉ रवी बाळस्कर, डॉ विवेक बडगुजर, प्रा. रामदास सुरळकर, प्रा. हर्षल सराफ, प्रा. सौ. मनीषा मोरे, प्रा.सौ.वैशाली राठोड, प्रा.सौ प्रियंका पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी विवेक तेले, कुंदन निकम, दीपक बाविस्कर, सुधाकर कोळी, प्रकाश डंबेलकर, .सुनील बैसाणे व जगदीश शिंगाणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
अशा प्रेरणादायी समारंभाच्या अयोजनास प्राचार्य डॉ.अरुण जैन,संस्थेचे चिटणीस प्रा.पराग पाटील यांनी मार्गदर्शन केले आणि यावेळी खान्देश मंडळाच्या सर्व सन्मानीय पदाधिका-याचे सहकार्य प्राप्त झाले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमोल मानके यांनी केले तर
प्रा.संतोष दिपके यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.