अमळनेर : येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज (स्वायत्त) अंतर्गत करिअर कौंसेलिंग सेंटरच्या वतिने स्वातंत्र्य दिन निमित्ताने भव्य सामान्य ज्ञान परीक्षा 15 ऑगस्ट 2025 रोजी 11 ते 12:30 दरम्यान संपन्न झाली.
यावेळी 160 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतले,यात 98 विद्यार्थिनी आणि 62 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यी सुद्धा परीक्षेस उपस्थित होते.
प्रस्तुत स्पर्धेच्या आयोजनास प्राचार्य डॉ.अरुण जैन यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी करिअर कौंसेलिंग सेंटरचे डॉ.विजय तुंटे, डॉ.आर सी सरवदे, डॉ.अमित पाटील,डॉ.धिरज वैष्णव,ग्रंथपाल दिपक पाटील, डॉ.माधव भुसनर,डॉ.रवी बाळसकर,डॉ.विलास गावित,डॉ.अनिल झळके,प्रा.रोहन गायकवाड, डॉ.बालाजी कांबळे,डॉ.राखी घरटे, डॉ.हर्ष नेतकर,प्रा.अमोल अहिरे,प्रा.हिमांशू गोसावी,डॉ.आकाश गव्हाणे,प्रा.विकास मोरे,प्रा.सागर सैदांणे,अमोल अहिरे,अतुल धनगर,महेश जाधव,सीसीएमसी विभागाचे कर्मचारी दिलीप शिरसाठ,पराग पाटील आदीनी उपस्थित राहून सहकार्य केले.
प्रस्तुत स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यास सप्टेंबर महिन्यात एका समारंभात अतिथीच्या -हस्ते बक्षीस प्रदान केले जाणार आहेत.
करिअर कौंसेलिंग सेंटर,प्रताप कॉलेजचा उपक्रम.
160 विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्तपणे
सहभाग.
98 विद्यार्थिनी, 62 विद्यार्थी सहभागी
कनिष्ठ विभागातील 08 विद्यार्थी
उपस्थित.