Saturday, August 30, 2025
Saturday, August 30, 2025
Saturday, August 30, 2025
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeMarathiपाडळसरे निम्न तापी सिंचन प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करून केंद्र...

पाडळसरे निम्न तापी सिंचन प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करून केंद्र शासनाने धरणासाठी ८५९.२२ कोटी रुपये मंजुरी.

अमळनेर:- तालुक्यातील पाडळसरे निम्न तापी सिंचन प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करून केंद्र शासनाने धरणासाठी ८५९.२२ कोटी रु.निधीला मंजुरी दिल्याचे पत्र नुकतेच प्राप्त होताच पाडळसरे जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष करून व्यक्त केला.
या प्रकल्पासाठी मागील दोन दशकांपासून पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचा संघर्ष सुरू होता. सदर निर्णया मुळे अमळनेर पारोळा चोपडा धरणगाव धुळे शिंदखेडा तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.यावेळी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष केला.यावेळी एकमेकांना पेढे भरून पदाधिकारी यांनी आनंद व्यक्त केला.तर महिला पदाधिकारी यांनी फुगडी घालून आनंद व्यक्त केला.
या प्रकल्पासाठी प्रारंभी प्रकल्पाच्या मान्यतेसाठी PIB (Public Investment Board) ची बैठक झाली. अर्थ मंत्रालयाकडून विशेष बैठक घेण्यात येऊन प्रकल्पासाठी मान्यता देण्यात येऊन पुढील प्रक्रियेसाठी प्रकल्प जलशक्ती मंत्रालयाकडे पाठवण्यात आला.अर्थ मंत्रालयाने सुचवलेल्या पूर्तता होऊन पुन्हा जलशक्ती मंत्रालयाकडून सदर प्रस्तावास अर्थ मंत्रालयाने पूर्ण तपासणी करून अंतिम मंजुरी दिली व जलशक्ती मंत्रालयाने या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करणेबाबत व त्यासाठी केंद्रशासनाचे ८५९.२२ कोटी रु.निधीला मंजुरीचे पत्र अधिकृतपणे केंद्र सरकारच्या अर्थ विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.या जल्लोषाच्यावेळी समितीचे प्रमुख सुभाष चौधरी,अर्बन बँकेचे व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे, महेंद्र बोरसे, हिरामण कखरे आदींनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी समितीतर्फे या निर्णयासाठी खासदार स्मिता वाघ, माजी मंत्री आ.अनिल पाटील, यांचेसह केंद्रीय जलशक्ती मंत्री मा.सी.आर.पाटील, मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार ,मा. एकनाथजी शिंदे, जलसंपदा मंत्री मा.गिरीश महाजन आणि पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील तसेच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मलाजी सीतारामन, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री मा. श्री.नितीन गडकरीजी यांचेसह लढ्यात सहभागी असलेले अमळनेर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचे जाहीर आभार समितीतर्फे व्यक्त करण्यात आलें.
याप्रसंगी सुभाष चौधरी,रणजित शिंदे, हेमंत भांडारकर, हिरामण कखरे, प्रताप साळी, महेश पाटील,सुनिल पाटील,देविदास देसले,सौ.उषाबाई चौधरी, सौ.वसुंधरा लांडगे, सौ.पायल पाटील,सौ. माधुरी पाटील,प्रशांत भदाणे, सुनिल भोई, सुरेश पाटील,महेंद्र बोरसे,ॲड.कुंदन साळुंखे, रामराव पवार, रहेमतुल्ला पिंजारी, लोटन पाटील, पुरुषोत्तम शेटे, कृषिभूषण सतिश काटे,गोकुळ पाटील , सुशिल भोईटे, दिलीप पाटील, मनोहरनाना पाटील,अधिकाराव पाटील,नारायण पाटील,दिलीप पाटील, राजेंद्र देसले,भावेश चौधरी,पंकज भोई आदींसह मोठ्यासंखेने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular