अमळनेर / प्रतिनिधी
शाखा अध्यक्षपदी कमलेश ओझा तर सचिवपदी रोहितकुमार.
अमळनेर- तालुक्यातील पश्चिम रेल्वे कर्मचारी परिषदेच्या अमळनेर शाखेची स्थापना दिनांक 27 जुलै रविवार रोजी अमळनेर रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आली.
या बैठकीसाठी पश्चिम रेल्वे कर्मचारी परिषदेचे झोनल सहाय्यक महासचिव संजय झा, मंडळ अध्यक्ष घनश्याम यादव, सचिव शैलेश म्हात्रे आणि मंडळ सदस्य सुरेश चौधरी उपस्थित होते.या बैठकीत विविध विभागातील 30 हून अधिक रेल्वे कामगारांनी सहभाग घेतला आणि आपल्या समस्या मांडल्या.झोनल सचिव आणि मंडळातील पदाधिकाऱ्यांनी सर्व कामगारांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.यावेळी पुढीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकारी:
शाखा अध्यक्ष-कमलेश ओझा(वरिष्ठ अनुभाग अभियंता,कर्षण वितरण,धरणगाव),शाखा सचिव- रोहित कुमार(ट्रॅक मॅनटर,अमळनेर),उपाध्यक्ष- मधुकर पाटील(स्टेशन मास्टर, अमळनेर) आणि आकाश शर्मा( (ट्रॅक मॅनटर,अमळनेर ),जॉईंट सेक्रेटरी-दीपक शिंदे(स्टेशन मास्तर,पाडसे),ऑफिस चेअरमन-राहुल आहेर(कनिष्ठ अभियंता, अमळनेर),संघटन मंत्री-रविंद्र पाटील,सहसंघटन मंत्री-पप्पूराम मीना,कोषाध्यक्ष-रजत बडगुजर, अमळनेर याप्रमाणे कार्यकारिणी गठीत करण्यात आली.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वानी अभिनंदन केले.