रिपोर्टर नूरखान
नांदेड, दि. 6 ऑक्टोबर : नांदेड जिल्हयातील 16 पंचायत समित्यांसाठी राखीव ठेवावयाच्या सभापती पदांसाठी आरक्षण सोडत शुक्रवार 10 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वा. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे काढण्यात येणार आहे. सर्व इच्छुक नागरिकांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
शासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकाचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण (महिला) ( अनु.जाती, अनु.जमाती, नामाप्र महिलांसह) राखीव ठेवावयाच्या तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या सभापती पदांची संख्या पुढील प्रमाणे निश्चित करून दिली आहे.
प्रवर्ग व राखीव जागा संख्या
अनुसूचित जाती : 2 जागा.
अनुसूचित जाती (महिला) : 1 जागा.
अनुसूचित जमाती : 1 जागा.
अनुसूचित जमाती (महिला) : 1 जागा.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : 2 जागा.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : 2 जागा.
सर्वसाधारण : 3 जागा.
सर्वसाधारण (महिला) : 4 जागा.