रिपोर्टर नूरखान
अमळनेर :– येथिल आयुर्वेद व युनानी डॉक्टरांची नोंदणीकृत संघटना नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) ची तालुका नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने करण्यात आली असून, अध्यक्षपदी डॉ. हेमंत कदम यांची निवड करण्यात आली आहे.
निवडीनंतर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आगामी काळात संघटनेमार्फत विविध वैद्यकीय उपक्रम हाती घेण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले. यामध्ये विशेषतः ग्रामीण भागात वैद्यकीय शिबिरे आयोजित करणे, नवीन वैद्यकीय धोरणांवर चर्चा, तसेच डॉक्टरांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे यांचा समावेश आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवा यांचा दर्जा उंचावण्यासाठीही कार्य करण्याचा निर्धार नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
निमा नूतन कार्यकारिणी पदाधिकारी पुढीलप्रमाणे.
अध्यक्ष – डॉ. हेमंत कदम,उपाध्यक्ष – डॉ. सचिन पाटील (काटे),सचिव – डॉ. उमेश सोनवणे,सहसचिव – डॉ. अक्षय न्हाळेदे,कोषाध्यक्ष – डॉ. हितेश मोरे,प्रचारक व समन्वयक – डॉ. पंकज चौधरी,महिला समन्वयक – डॉ. पूजा पंजवाणी (वाघुले)
नवीन कार्यकारिणीत निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे वैद्यकीय वर्तुळात अभिनंदन होत असून, आगामी काळात त्यांच्या नेतृत्वात निमा संघटना अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.