जळगांव:- मुक्ताईनगर येथील नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी तालुका मुक्ताईनगर येथे मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या सप्तशतकोत्तर जयंती महोत्सवी वर्षानिमित्त विद्यालयातील इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सामूहिक पसायदान म्हटले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी मुक्ताईनगर तालुक्यात 11 शाळांमध्ये मागील पाच महिन्यापूर्वी ओळख श्री ज्ञानेश्वरीची ह्या महा उपक्रमास प्रारंभ केलेला आहे यासाठी आळंदी संस्थांचे विश्वस्त त्याचप्रमाणे ओळख श्री ज्ञानेश्वरी हा महा उपक्रम राबवणारे श्री ज्ञानेश्वरी चरित्र समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश काळे, श्री विलास वाघमारे, श्री तुकाराम गवारी, श्री विकास शिवले, श्री अर्जुन मेदनकर व त्यांचे सहकारी या उपक्रमात मुक्ताईनगर तालुक्यातील नवीन माध्यमिक विद्यालय, सुकळी नवीन माध्यमिक विद्यालय,पारंबी, शिवाजी हायस्कूल कुऱ्हा काकोडा, स्वर्गीय अशोक फडके माध्यमिक विद्यालय, कुऱ्हा काकोडा, श्री शिवाजी हायस्कूल, वडोदा डॉ. जगदीश दादा पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय, मुक्ताईनगर श्री एस. बी. चौधरी विद्यालय, चांगदेव या शाळांमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा उपक्रम राबवण्यात आला याप्रसंगी आळंदी येथील मान्यवर उपस्थित होते यामध्ये त्या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांकडून दर शनिवारला ज्ञानेश्वरी, हरिपाठ व पसायदान घेतात डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी 4 जानेवारी 2025 रोजी आळंदी येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या सप्तशतकोत्तर जन्म महोत्सवी वर्षानिमित्त तसेच आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या 745 व्या सप्तशतकोत्तर जन्म महोत्सवी वर्षानिमित्त शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनाचे मोठ्या थाटात व उत्साहात आयोजन करून यशस्वी केले. ही सुद्धा आठवण डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी विद्यार्थ्यांना याप्रसंगी करून दिली.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संतोष पाचपोळ सर ज्येष्ठ शिक्षक डॉ.शिवचरण उज्जैनकर शिक्षक तथा विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री संतोष ठाकूर सर श्री रोहन आठवले सर व शिक्षकेतर श्री रघुनाथ इंगळे व श्री विनायक इंगळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.