Friday, May 9, 2025
Friday, May 9, 2025
Friday, May 9, 2025
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeMarathiधुळे सुरत बसचा कोंडाईबारी घाटात भीषण अपघात; २५ जखमी, पाच गंभीर

धुळे सुरत बसचा कोंडाईबारी घाटात भीषण अपघात; २५ जखमी, पाच गंभीर

नवापूर (मनोज बोरसे) : धुळे-सुरत मार्गावरील कोंडाईबारी घाटात बुधवारी संध्याकाळी एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये किमान २५ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी पाचची अवस्था गंभीर आहे. घटना स्थळी स्थानिक नागरिक, पोलीस आणि आरोग्यकर्म्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.

घटनेचा तपशील

संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान, धुळ्याहून सुरतकडे जाणारी एमएच २० बी एल ४०४९ क्रमांकाची प्रवासी बस कोंडाईबारी घाटाच्या पहिल्या वळणावर ओव्हरटेक करत असताना एका ट्रकने अचानक कट मारला. यामुळे बस नियंत्रणाबाहेर होऊन महामार्गाच्या वरच्या टप्प्यावरून खालच्या टप्प्यावर सुमारे ८ ते १० फूट उंचीवरून कोसळली. बस दोनदा पलटून उलटली, ज्यामुळे बसचे मोठे प्रमाणात नुकसान झाले.

प्रवाशांची स्थिती आणि बचावकार्य

बसमध्ये सुमारे ५०हून अधिक प्रवासी होते. त्यापैकी २५ ते ३० प्रवाशांना किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या जखमा आल्या आहेत. पाच प्रवाशांच्या हालती गंभीर असल्याने त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच नवापूर, विसरवाडी आणि साक्री येथील रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या. स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि विसरवाडी पोलीस मदत केंद्रातील कर्मचाऱ्यांनी जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून साक्री, दहिवेल आणि विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

नेते एजाज शेख यांनी केली मदत

या मार्गाने प्रवास करीत असलेले भाजपाचे अल्पसंख्याक प्रदेश सदस्य एजाज शेख घटनास्थळी थांबले. त्यांनी स्वतः जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यास मदत केली आणि १०८ आणीबाणी रुग्णवाहिका बोलावून पथकाला सहाय्य केले.

रुग्णालयातील उपचार

विसरवाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमींवर त्वरित प्राथमिक उपचार सुरू केले. ७ प्रवाशांना किरकोळ इजा झाल्या असून, ५ जणांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

दैवाने टळली मोठी दुर्घटना

बसमधील एका प्रवाशाने सांगितले की, “बस आणखी एक पलटी मारली असती तर ती खोल दरीत कोसळली असती. दैवाने आम्ही वाचलो.”

पोलिसांनी सुरू केली चौकशी

ग्रामीण पोलीस आणि विसरवाडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनेची *तपासणी सुरूकेली आहे. ट्रक चालकाचा शोध सुरू असून, अपघाताच्या कारणांची पुष्टी होण्याची प्रक्रिया चालू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular