रिपोर्टर नूरखान
जळगाव – दहिगाव यावल येथील इम्रान पटेल यांचा अत्यंत निर्दयपणे खून करण्यात आला असून, या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ माजवली आहे. आरोपींनी स्वतः पोलिस स्टेशनमध्ये जाऊन अटक करवून घेतल्याने हा खून अधिकच चर्चेचा विषय बनला आहे.
चौकशीची मागणी.
एकता संघटनेने या हत्याकांडावर गंभीर चिंता व्यक्त करत एक विशेष समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. फारूक शेख, करीम सालार, नदीम मलिक, कुर्बान शेख आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखालील संघटनांनी यावल पोलिस स्टेशनला भेट देऊन पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याशी चर्चा केली.
पोलिस अधीक्षक रेड्डी यांनी आश्वासन दिले की या खूनाच्या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल आणि तपास लवकर पूर्ण केला जाईल. त्यांनी या खुनाला अत्यंत निर्दयी ठरवले असून, आरोपींना योग्य शिक्षा देण्याची ग्वाही दिली.
सामाजिक एकता आणि शांतता.
सदर हत्याकांडावरून यावल येथील दहीगावमध्ये हजारो लोक उपस्थित होते. यावलीत एकत्र येणाऱ्यांमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील लोकांचा समावेश होता, जो एकता आणि शांततेचा संदेश देणारा ठरला.
विशेष समिती चौकशीची मागणी.
चौकशीसाठी विविध संघटनांच्या वतीने जळगाव पोलिस अधीक्षकांकडे मागणी केली आहे की हत्येच्या प्रकरणाची एक विशेष समिती मार्फत तपासणी केली जावी, आणि या प्रकरणाचा तपास एका महिन्याच्या आत पूर्ण केला जावा.
समाजाची अपेक्षा.
स्थानिक लोक आणि सामाजिक कार्यकर्ते यावर एकसारख्या प्रतिक्रिया देत आहेत की या खुनाच्या प्रकरणी कायद्याचा कठोरतेने अवलंब करावा आणि आरोपींना कडक शिक्षा द्यावी, तसेच समाजात विश्वास निर्माण करण्यासाठी एक पारदर्शक चौकशी केली जावी.