₹७२,९६० किंमतीचा मुद्देमाल जप्त, सहा पोलिसांचा सतर्क सहभाग
Dhule :@wahid kakar
थाळनेर पोलिसांनी होळनांथे (ता. शिरपूर) येथे अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या पंढरीनाथ भोई याच्यावर छापा टाकत ₹७२,९६० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २३ जुलै रोजी दुपारी १ वाजता करण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, त्यांनी पोहेकॉ. भुषण चौधरी, पोकॉ. किरण सोनवणे, धनराज मालचे, मुकेश पावरा, चा.पो.कॉ. दिलीप मोरे आणि पोसई समाधान भाटेवाल यांना कारवाईचे आदेश दिले. पथकाने स्थानिक पंचांसह सिद्धीविनायक कॉलनी, होळनांथे येथे छापा टाकला.
तेव्हा पंढरीनाथ संपत भोई (५१, रा. होळनांथे) घराच्या आडोशाला संशयास्पद खोके लपवत असल्याचे निदर्शनास आले. झडतीदरम्यान टँगो पंच देशी दारूचे १६ बॉक्स (₹५३,७६०) व पॉवरकुल बिअरचे ८ बॉक्स (₹१९,२००) असा एकूण ₹७२,९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भोई याच्याविरोधात प्रोव्हिबिशन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. भुषण चौधरी करीत आहेत.
ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.