अमळनेर :- येथील रोटरी लायन्स तर्फे “झाडे लावा – पर्यावरण वाचवा” या प्रेरणादायी संकल्पनेला मूर्तरूप देत, लायन्स क्लब ऑफ अमळनेर यांच्या वतीने रविवारी सकाळी ९ वाजता मंगळग्रह मंदिराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या पर्यावरणपूरक उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ लायन पी.डी.जी. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी चिंच, कडुलिंब, वड, आंबा यांसारख्या विविध प्रकारची झाडे लावून निसर्गाशी आपले नाते अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. या वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी समाजात रुजविण्याचा प्रयत्न लायन्स क्लबने केला.
या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. संदीप जोशी, सचिव महेंद्र पाटील, कोषाध्यक्ष नितीन विंचूरकर, तसेच प्रोजेक्ट चेअरमन लायन विनोद अग्रवाल, मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले, पंकज मुंदडा, डॉ. मयुरी जोशी, शेखर धनगर, प्रशांत सिंघवी, राजेश कुंदनानी, योगेश मुंदडा, जितेंद्र जैन, प्रदीप जैन, सोनल जोशी आणि मनीष जोशी यांची विशेष उपस्थिती लाभली. लायन डिगंबर महाले सर व मंगळ ग्रह संस्थान यांचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.
‘We Serve’ या ब्रीदवाक्याला अनुसरून, लायन्स क्लब ऑफ अमळनेर समाजात असे अनेक उपक्रम राबवून पर्यावरण रक्षणाची आपली सामाजिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहे.