अमळनेर :- लायन्स क्लब ऑफ अमळनेर यांच्या वतीने जागतिक अवयवदान दिनानिमित्त (१३ ऑगस्ट) अवयवदान जनजागृती पोस्टरचे उद्घाटन व वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नर्मदा मेडिकल फाउंडेशन, अमळनेर येथे सकाळी ९ वाजता झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमातून “अवयवदान – जीवनाची देणगी” हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमात अवयवदानाविषयी माहिती देत “अवयव स्वर्गात नेऊ नका, त्यांची गरज इथेच आहे” हा संदेश उपविभागीय अधीकारी नितीन मुंडावरे यांनी दिला.
पोस्टरचे अनावण प्रसंगी लायन्स क्लब अध्यक्ष संदिप जोशी,, सचिव महेंद्र पाटील, खजिनदार नितीन विंचूरकर, मयुरी जोशी, डॉ. युसूफ पटेल, निरज अग्रवाल, प्रशांत, सिंघवी, महावीर पहाडे, प्रितम मणियार,राजेश कुंदनानी, रोनक दोडीवाला, यासाह असंख्य लायन्स सभासद व नागरिक उपस्थित होते. तदनंतर अमळनेर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये अवयव दान जनजागृती पोस्टरचे वितरण करण्यात आले. लायन्स क्लब सदस्य व नर्मदा मेडिकल फाउंडेशन मध्ये उपस्थित रुग्ण व नातेवाईकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
या मोहिमेतून अनेक नागरिकांनी अवयवदानाची प्रतिज्ञा करून समाजासाठी योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली.