ज्योत असे समतेची शांती अन् स्वातंत्र्याची समृद्धीचे हे प्रतिक
गाथा ही बलिदानाची.
अमळनेर :- येथील दि 15 ऑगस्ट 2025, वार – शुक्रवार रोजी आमच्या जि.प.प्राथ शाळा ,जवखेडे, ता. अमळनेर, जि जळगाव येथे 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करण्यात आला. प्रथम उपस्थित मान्यवर सरपंच सौ.जयश्रीताई माळी, अध्यक्षा सौ. कविताताई पाटील ॲड. डी.वाय.पाटील यांचे हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ताईसो.सौ.कविता प्रफुल्ल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत,राज्यगीत, व ध्वजगीताचे गायन करण्यात आले.तद्नंतर सर्व विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीताच्या धुनवर सामुहिक कवायत केली. विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतांवर नृत्य, देशभक्ती गीताचे गायन व इंग्रजीतून भाषण सादर केले. या कार्यक्रमाप्रसंगी दादासो. कै लटकन लकडू पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ दादासो. जगन्नाथ लटकन पाटील, ताईसो.याअशाबाई प्रकाश पाटील, दादासो. विनायक पिरन पाटील या परिवाराकडून इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले.तसेच.कै.वेणूबाई सुकदेव पाटील यांच्या स्मरणार्थ एम.टी.एस. स्काँलरशिप या स्पर्धा परिक्षेत मेरीट मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याना प्रत्येकी 500 रू.बक्षीस म्हणून दादासो.श्री. जगन्नाथ लटकन पाटील यांनी 15 आँगस्टला बक्षीस देण्याचे जाहिर केले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सालाबादाप्रमाणे कै. तुकाराम नथ्थु पाटील ( गुरुकृपा ट्रेडर्स धुळे ) यांचे स्मरणार्थ श्री.खुशाल पाटील यांचेकडून विद्यार्थांना बुंदी व शेव यांचा खाऊ वाटप करण्यात आला. तसेच दादासो जिजाबराव भटा पाटील यांचेकडून विद्यार्थ्यांना खाऊसाठी 500 रु भेट देण्यात आले.तसेच कै.खेमचंद हिरालाल जैन यांच्या स्मरणार्थ मनोज खेमचंद जैन यांच्याकडून चॉकलेट वाटप करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा ताईसो.सौ. कविता प्रफुल्ल पाटील यांचेकडून देखील चॉकलेटचे वाटप करण्यात आले. या सर्व दात्यांचे मुख्याध्यापक छगन पाटील यांनी सर्वांचे आभार.मानले.कार्यक्रमाप्रसंगी जवखेडे गावाच्या सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य, बाला उपक्रम समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रामसेवक सर्व कर्मचारी गावातील प्रतिष्ठीत नागरीक, शिक्षणप्रेमी विद्यार्थ्यांचे पालक,सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच आशा सेविका उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक छगन पाटील, उपशिक्षक रत्नप्रभा साळुंखे, रेखा पाटील, सौ सुनिता पाटील, अर्चना बागुल, मुकेश पाटील, माधवराव ठाकरे, युवा प्रशिक्षणार्थी अनिता बोरसे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुकेश पाटील सर यांनी केले.अशाप्रकारे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.