रिपोर्टर नूरखान
अमळनेर :– राज्यातील ३२ जिल्हा परिषद व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित करण्यात आला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी यासाठी वापरण्यात येणार आहे.
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती गणनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. नागरिकांना या प्रारूप यादीवर ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील.
सर्व हरकतींचा विचार करून सुधारित अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी मतदान केंद्रनिहाय प्रकाशित करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी आणि आवश्यक असल्यास वेळेत हरकती व सूचना दाखल कराव्यात.