अमळनेर :- येथील विविध आदिवासी संघटनांच्यावतीने विश्व आदिवासी दिवस मंगळ ग्रह मंदिर परिसरातील भव्य पटांगणावर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाने साजरा करण्यात आला.यावेळी आदिवासी बंधू भगिनींनी वाजत गाजत भव्य शोभायात्रा काढली.
यावेळी आदिवासी क्रांतिकारक व महामानवांचे स्मरण करण्यात आले. भव्य मंचावर आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक गीते सादर केली तर आदिवासी नृत्य करून विद्यार्थ्यांनी उपस्थित हजारो आदिवासी बांधवांना नाचायला लावले. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या आदिवासी कलाकारांना सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागासाठी याप्रसंगी सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंचावर आदिवासी पा.क्रांती संघटनेचे अध्यक्ष मुकेश साळुंखे , अमळनेर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, आदिवासी संघटनेचे महासचिव दिपक भाऊ खांदे,सामाजिक कार्यकर्ते गुलाब बोरसे,महेंद्र पवार,भगवान सैंदाने, सौ.सखुबाई पवार,सचिव अमोल सुर्यवंशी,राज्य प्रसिद्धी प्रमुख दिनेश चव्हाण, कमलेश चव्हाण ,आनंद पवार,जगदीश साळुंखे,आनंद चव्हाण,संजय पारधी, धनराज पवार, राजा सोनवणे,पंकज पारधी,विकास पवार,रावसाहेब पवार यांचे सह मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय पवार यांनी केले.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांचे तर्फे यावेळी सन्मानचिन्ह व बक्षिसं देण्यात आले होते.
यानंतर आदिवासी सांस्कृतिक मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. मिरवणूक अंमळनेर शहरातून जल्लोषात वाजत गाजत निघाली. ताडेपुरा , पैलाड,डॉ. आंबेडकर पुतळा, समशेरसिंग चौक, बाजार,पाचपावली मंदिर,बस स्टँड मार्गे महाराणा प्रताप चौक येथे समारोप झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साठी अजय पवार,रोहित ठाकरे,आकाश पवार,दादा पवार,अर्जुन महाले यांचेसह आदिवासी युवक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
जागतिक आदिवासी दिवस मोठ्या थाठात साजरा करण्यात आला.
RELATED ARTICLES