रिपोर्टर नूरखान
अमळनेर नगरपरिषद व महसूल विभाग यांचा संयुक्त उपक्रम – सेवा पंधरवड्यांतर्गत प्रभावी अंमलबजावणी.
अमळनेर:-राज्य शासनाच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत इंदिरा भवन, अमळनेर येथे आज छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५०० ते ६०० नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमास मा. आमदार अनिल भाईदास पाटील, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अमळनेर नगरपरिषदेतर्फे शिबिरातील महत्त्वपूर्ण उपक्रम.
दीनदयाळ अंत्योदय योजना (NULM विभाग)
महिला बचत गटांना ₹७३.६० लाखांचे कर्जवाटप.
PM स्वनिधी योजनेतर्गत १७ लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध.
विश्वकर्मा योजना व बचत गटांना मार्गदर्शन.
विद्युत विभाग.
PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना अंतर्गत सौरऊर्जेच्या वापराबाबत सविस्तर माहिती.
सोलर पॅनलमधून वीज निर्मिती, वीज बिलात कपात व अतिरिक्त वीज विक्री याबाबत मार्गदर्शन.
ऑनलाईन अर्ज, पात्रता, कागदपत्रे व अनुदान यांची माहिती नागरिकांना देण्यात आली.
नागरिकांनी ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि स्वावलंबन या त्रिसूत्री उद्दिष्टांबद्दल समाधान व्यक्त केले.
बांधकाम विभाग.
प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत घरकुल वाटप व परवानग्यांचे वितरण.
बांधकाम परवानग्या व ८ घरकुल चाव्यांचे वाटप (प्रातिनिधिक स्वरूपात).शिबिराचा उद्देश. नागरिकांच्या समस्या सोडवणे, योजनांची माहिती थेट लोकांपर्यंत पोहोचवणे आणि “सेवा पंधरवडा” उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.