नाशिक. वार्ताहर
आज संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने शासकीय विश्रामगृह नाशिक येथे आकाच्या आकाचा आका असलेल्या गुरुमाऊली संदर्भात खळबळ जनक आरोप संभाजी ब्रिगेडच्या पत्रकार परिषदेत करण्यात आले. मागील महिन्यातील 15 व 16 तारखेला वाल्मीक कराड व त्याचा साथीदार विष्णू चाटे हे त्याच्यासोबत होते . अशा पद्धतीचा आरोप त्या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर मागच्या वर्षी घडलेलं सारिका बाबुराव सोनवणे प्रकरणात गुरुमाऊलीनी त्या महिलेचा लैंगिक शोषण करून खोट्या आरोपाखाली निंबा शिरसाठ नावाचा प्रकरण उभा करून त्या महिलेला खंडणीचे खोटे आरोप दाखल केले त्या महिलेने आमच्याकडे दिलेले काही कागदपत्र होते ते आम्ही मीडियासमोर सादर केले आपल्या प्रसिद्ध माध्यमातून ही भूमिका जाणं महत्त्वाची असून या भूमिकेवर प्रकर्षाने प्रकाश टाकावा अशी आमची विनंती आहे त्याचबरोबर वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे थेट संबंध गुरुमाऊली यांच्याशी आहेत असा देखील आमचा आरोप आहे आणि त्या आरोपामध्ये 100% सत्य आहे तृप्ती देसाई यांनी घेतलेल्या भूमिकेची आम्ही पूर्णपणे समर्थन आम्ही त्यांना देत आहोत गुरुमाऊली धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे लागेबांधे आहेत सारिका सोनवणे यांना सस्पेंड करण्यामध्ये देखील धनंजय मुंडे यांचा हातभार आहे कारण त्या कृषी सहाय्यक होत्या त्यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे होते म्हणून त्यांनी त्यांचा निलंबन करून अशा पद्धतीचे खोट्या आरोपाखाली तिला जेलबंद केलं होतं ती महिला आता नाशिक मधून गहाळ झालेली आहे तिचा शोध पोलिसांनी घ्यावा किंवा गृहमंत्र्यांनी घ्यावा अशी मी जबाबदारीने या ठिकाणी व्यक्त वक्तव्य करत आहे त्याच पद्धतीने गृहमंत्र्यांनी कोणाची दखल अंदाजी या केस मध्ये घेऊ नये आमचा भाऊ संतोषजी देशमुख याची निर्गुण पणे हत्या केलेली या कराडच्या साथीदारांनी केलेली आहे याच्यामध्ये कोणालाही न वगळता कायदेशीर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. गृहमंत्र्यांवर आम्हाला विश्वास आहे की ते कोणालाही पाठीशी घालणार नाहीत . सुरेश धस मांडत असलेली भूमिका आणि तृप्ती देसाई यांनी घेतलेली भूमिका ही योग्य आहे आणि त्यांनी केलेले गुरुमाऊलींवरचे आरोप हे शंभर टक्के सत्य आहेत त्याच्या बाबतीत त्यांना कुठली मदत लागल्यास संभाजी ब्रिगेड त्यांच्या पाठीशी सक्षम आहे आणि त्या महिला म्हणून जिजाऊ सावित्री रमाई अहिल्यामाई वारस म्हणून ते आता भूमिका मांडत आहेत आम्ही त्यांच्या मागे उभे आहोत आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने गुरु माऊलींवर आम्ही केलेले आरोप हे शंभर टक्के सत्य असून आमच्याकडे ती महिला 3 ऑक्टोबर 2023 रोजी आली होती तिने आम्हाला या सगळ्या घटना सांगितल्या होत्या त्यानंतर तिने काही कागदपत्र देखील आम्हाला दिलेले होते पंचवटी पोलीस स्टेशनचे पीआय अनिल शिंदे यांच्याकडे तिने फिर्याद नोंदवलेले असताना 24 तासाच्या गुन्हा दाखल झाला नाही त्यानंतर निंबा शिरसाठ नावाचा प्रकरण समोर आलं आणि गुरुमाऊली हे आरोपींना सावली देण्याचा काम करतात असा देखील आमचा आरोप आहे विष्णू चाटे वाल्मीक कराड आणि त्याचा साथिदार असलेला तो कृष्ण आंधळे आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी त्यासोबत आरोपी गुरुमाऊलीला करण्यात यावा अशी आम्ही विनंती आहे.