Monday, September 1, 2025
Monday, September 1, 2025
Monday, September 1, 2025
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeMarathiगावठी पिस्तुलांची विक्री उधळली; दोन तरुणांना अटक, १.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त.

गावठी पिस्तुलांची विक्री उधळली; दोन तरुणांना अटक, १.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त.

रिपोर्टर नूरखान

अमळनेर :- चोपडा रस्त्यावर गावठी पिस्तुलांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलिसांनी धाडसत्र राबवून दोन तरुणांना अटक केली. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे आणि दोन मोटरसायकली असा एकूण १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

२८ ऑगस्ट रोजी रात्री पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली की चोपडा रस्त्यावर असलेल्या आसाराम बापू आश्रमाजवळ दोन इसम पिस्तूल विक्रीसाठी आले आहेत. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, मिलिंद सोनार, उदय बोरसे, निलेश मोरे व विनोद संदानशिव यांच्या पथकाने तात्काळ कारवाई केली.

पोलिस पथक घटनास्थळी पोहोचताच दोघे संशयित इसम पळण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. चौकशीत त्यांची नावे विशाल भैय्या सोनवणे रा. ढेकूसीम आणि गोपाल भीमा भिल अशी असल्याचे समोर आले.

त्यांच्याकडे प्रत्येकी एक गावठी पिस्तूल आणि प्रत्येकी तीन जिवंत काडतुसे आढळून आली. तसेच, एक मोटरसायकल (क्र. एमएच ५४ ए ३५४) आणि एक बिना नंबरची मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली. या कारवाईत एकूण १,६६,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular