Sunday, August 31, 2025
Sunday, August 31, 2025
Sunday, August 31, 2025
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeUncategorizedगांधलीपुरा भागातील डिपीवरील ओव्हरलोडमुळे नागरिक त्रस्त, महावितरणकडे नवीन डिपी बसविण्याची मागणी.

गांधलीपुरा भागातील डिपीवरील ओव्हरलोडमुळे नागरिक त्रस्त, महावितरणकडे नवीन डिपी बसविण्याची मागणी.

अमळनेर :- तालुक्यातील गांधलीपुरा येथील अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रह.) स्टडी सेंटर व पब्लिक लायब्ररीजवळ असलेल्या जुनी डिपी (ट्रान्सफॉर्मर) सतत ओव्हरलोड होत असल्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा नियमितपणे सकाळ-संध्याकाळ बंद होतो. विशेषतः नगरपरिषदेचे नळ सुरु होण्याच्या वेळेस लाईन बंद पडत असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सततच्या वीज खंडिततेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, वारंवार वायरमॅनच्या मदतीने लाईन सुरू केली जाते. मात्र काही वेळातच लाईन पुन्हा बंद होते. त्यामुळे पाणी भरण्याचे वेळापत्रक कोलमडत असून, नागरिकांना पाण्यासाठी इतर ठिकाणी धावपळ करावी लागत आहे.

या समस्येच्या तात्काळ सोडवणुकीसाठी गांधलीपुरा परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते मौलाना रियाज शेख यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीच्या अमळनेर शहर कक्ष 1 येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता टिकाराम हरी नेमाड़े साहेब यांना निवेदन दिले.

या निवेदनावर पुढील नागरिकांची उपस्थिती होती :
अ. गफ्फार खाटीक, सामाजिक कार्यकर्ता मनोज मोरे, साहाबोद्दीन शेख, फारुख खाटीक, अकबर भाई, सिकंदर पेंटर,शाहीद मुजावर, राहील पठान नेरकर अप्पा लाईन मैन, युसूफ खन्ना वायरमैन,व इतर स्थानिक नागरिक.

नागरिकांनी मागणी केली आहे की सदर जुनी डिपी बदलून त्या ठिकाणी अधिक क्षमतेची नवीन डिपी लावण्यात यावी, जेणेकरून परिसरातील वीजपुरवठा सुरळीत राहील आणि पाणीपुरवठ्यावर होणारा परिणाम टाळता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular