रिपोर्टर नूरखान
अमळनेर शहरात धार्मिक सलोख्याला धक्का; पोलिसांकडे तात्काळ कारवाईची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा.
अमळनेर :- शहरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान धार्मिक सलोखा बिघडवणारी गंभीर घटना घडली आहे. माळीवाडा परिसरातून जाणाऱ्या मिरवणुकीदरम्यान मुस्लिम समाजाच्या घरावर गुलाल फेकल्याचा तसेच चप्पल भिरकावला माळीवाडा मंडळातील काही युवकाकडून करण्यात आला आहे.
ही घटना गुरुवारी रात्रीची १०:३० वाजल्यानंतर घडली. शहरातील माळीवाडा, भाईवाडा, पानखीडकी आदी भागांतून गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. माळीवाडा मंडळाच्या मिरवणुकीदरम्यान मुस्लिम मोहल्ल्यातील एका घरावर गुलाल फेकण्यात आला आणि काही असामाजिक तत्वांनी मुस्लिम घरावर चप्पल देखील फेकल्या.
या प्रकारामुळे मुस्लिम समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली असून, समाजातील प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे मंडळावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहे. “प्रशासन असतांना असे प्रकार घडतात, याचा आम्हाला खेद वाटतो. आम्ही शांतता राखत आहोत, पण आमच्या भावना दुखावल्या गेल्या. कारवाई झाली नाही, तर समाजाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
कायद्याचे उल्लंघन ?
राज्य सरकारने सार्वजनिक मिरवणुकांसाठी वेळेचे बंधन घातलेले नाही का ?रात्री उशिरापर्यंत मिरवणुका काढल्या जात असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “मिरवणूक काढणाऱ्यांना कायदा लागू होत नाही का?” असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित परिसरात बंदोबस्त वाढवला असून, शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. घटनेचा सखोल तपास सुरू असून, दोषींवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
अशा संवेदनशील घटनांमध्ये दोन्ही समाजांनी संयम ठेवणे आणि कायद्यावर विश्वास ठेवणे अत्यावश्यक आहे. सण-उत्सव हा आनंदाचा असतो, त्यातून तेढ निर्माण होणे ही समाजासाठी हानीकारक बाब आहे.