औरंगाबाद गंगापूर रिपोर्टर वसीम सय्यद
गंगापूर न्यूज साठी संपर्क करा मो,९८९०२७९९८२
नगर परिषद हद्यातील प्रभाग क्रमांक 7 मधील परदेश पुरा ते बीबी माई मस्जिद चमनपुरा दर्गा पर्यंत सिमेंट रस्ता करा अन्यथा उपोषण करण्यात येईल
गंगापूर शहरातील प्रभाग क्रमांक ( ७ ) मधील परदेश पुरा ते बीबी माई मस्जिद चमनपुरा दर्गा पर्यंत जाणारा रस्ता हा अत्यंत खराब झालेला असून सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाचे पाण्याने डपके तयार होत असून त्यामुळे चिखला सह घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून रोगराई होण्याच्या धोका वाढला आहे त्यामुळे हा रस्ता त्वरित बनवण्याची मागणी या भागातील रहिवाशांनी मुख्याधिकारी त्यांच्याकडे निवेदनाद्वारा केली आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की वारंवार नगरपरिषदेला निवेदन देऊनही प्रभाग क्रमांक ( ७ ) मधील परदेश पुरा ते बीबी माई मस्जिद चमनपुरा दर्गा पर्यंत जाणारा रस्ता होत नाही थोडासाही पाऊस पडला तर येथील नागरिकांना चिखलामुळे व साचलेल्या पाण्यामुळे रस्त्याने चालता येत नाही या भागात डासांचे प्रमाण देखील अधिकच वाढलेले असून परिसरातील लहान मुलांना वृद्धांना व नागरिकांना अनेक आजारांना समोर जावे लागत आहे हा रस्ता लवक बनवण्याची मागणी येथील स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकारी त्यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे या निवेदनावर मोहम्मद बाकोदा , सय्यद शौकत , प्रशांत मुळे , अश्फाक जागीरदार , मुसा शाह , धनराज राजपूत , पोपट राजपूत , शेख इरफान , सोहेल पठाण , वाजीद बाकोदा , मुशर्रफ अली , सुरेश जगदाळे , अक्षय जगदाळे , समद पठाण , रफिक कुरेशी , इमरान खान , सह इत्यादींच्या सह्या आहेत

