Tuesday, September 2, 2025
Tuesday, September 2, 2025
Tuesday, September 2, 2025
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeMarathi"क्रीशव चायनीजच्या स्वयंपाकघरात दुर्गंधीचा साम्राज्य!"

“क्रीशव चायनीजच्या स्वयंपाकघरात दुर्गंधीचा साम्राज्य!”

रिपोर्टर नूरखान

क्रीशव चायनीजवर अस्वच्छता,अन्न व औषध प्रशासन विभागाने लक्ष देण्याची गरज.

अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील मध्यवर्ती भागातील निकुंभ कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेले क्रीशव चायनीज फास्ट फूड सेंटर सध्या अस्वच्छतेमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार या ठिकाणी चायनीज खाद्यपदार्थ अत्यंत घाणेरड्या आणि आरोग्यास हानिकारक अशा परिस्थितीत तयार केले जात आहेत.

निकुंभ कॉम्प्लेक्स हे अमळनेरमधील एक वर्दळीचे व व्यापारी दृष्टिकोनातून महत्वाचे ठिकाण आहे. याच परिसरात क्रीशव चायनीज नावाचा स्टॉल गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. येथे रोज शेकडो ग्राहक, विशेषतः विद्यार्थी आणि तरुण वर्ग, खाद्यपदार्थ घेतात. मात्र, अलीकडे काही सजग नागरिकांनी याठिकाणी तयार होणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

स्थानिक नागरिकांच्या मते, ज्या ठिकाणी चायनीज पदार्थ तयार केले जातात, त्या स्वयंपाकघरात अत्यंत गलिच्छ अवस्था आहे. फर्शावर पाणी आणि अन्नाचे उरलेले अंश, भिंतींवर तेलकट थर, आणि आजूबाजूच्या परिसरात उघड्यावर टाकलेले कचरा यामुळे दुर्गंधी पसरली आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे अन्नातून होणाऱ्या आजारांचा धोका वाढत आहे.

या अन्नाची गुणवत्ता आणि तयार करण्याची पद्धत पाहता, अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) तात्काळ लक्ष घालून तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच, आरोग्य विभागाने आणि पालिकेने या विक्रेत्यांकडून परवाने, स्वच्छतेबाबतची प्रमाणपत्रे तपासून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

शहरातील आरोग्य धोक्यात.

शहरातील अनेक लहान मुले, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, तसेच कामगार वर्ग रोज संध्याकाळच्या वेळी येथे चायनीज खात असतो. अशा अस्वच्छ परिस्थितीत तयार होणारे अन्न हे गंभीर पोटदुखी, विषबाधा, आणि इतर संसर्गजन्य रोगांना निमंत्रण देणारे ठरू शकते. अशा प्रकारच्या विक्रेत्यांवर वेळेत कारवाई न झाल्यास संपूर्ण शहराच्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.

संबंधित यंत्रणांनी लक्ष घालावे.

क्रीशव चायनीजवरील या तक्रारींना गांभीर्याने घेऊन अन्न व औषध प्रशासन विभाग, नगरपरिषद आणि आरोग्य यंत्रणांनी संयुक्तरीत्या कारवाई करण्याची गरज आहे. तसेच शहरातील इतरही फास्ट फूड विक्रेत्यांची तपासणी करून, सर्वत्र स्वच्छता राखली जात आहे की नाही याची खातरजमा करणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular