Wednesday, October 15, 2025
Wednesday, October 15, 2025
Wednesday, October 15, 2025
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeMarathiएसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट : ६ हजारांची रक्कम; वेतनवाढीचा फरकही वेतनासोबत मिळणार.

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट : ६ हजारांची रक्कम; वेतनवाढीचा फरकही वेतनासोबत मिळणार.

रिपोर्टर नूरखान


१२,५०० रुपये दिवाळी अग्रिम; सरकारकडून तब्बल ६५ कोटींचा निर्णय.

अमळनेर :- राज्यातील एसटी महामंडळाच्या सुमारे ८५ हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना यंदाची दिवाळी गोड होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घेतलेल्या निर्णयानुसार, कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट, वेतनवाढीचा फरक वेतनात समाविष्ट करून देण्यासह १२,५०० रुपयांचा दिवाळी अग्रिम देण्यात येणार आहे.

या निर्णयाची घोषणा सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या बैठकीनंतर करण्यात आली. बैठकीस उपमुख्यमंत्री शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, तसेच शासन आणि महामंडळातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्य शासनाने ६ हजार रुपयांच्या दिवाळी भेटीसाठी ११ कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. याशिवाय, सन २०२० ते २०२४ दरम्यान झालेल्या वेतनवाढीचा फरक कर्मचारी वर्गाला दरमहा वेतनासोबत देण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून ६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, दिवाळी अग्रिम रक्कम देण्यासाठी ५४ कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केली आहे.

या निर्णयावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “राज्यातील अतिवृष्टीमुळे जनतेसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. मात्र, शेतकरी आणि कामगार वर्गाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी सुखाची व्हावी यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.”

एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी महामंडळाच्या मालमत्तेचा सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्वावर विकास करण्याचा विचारही शासनाच्या पातळीवर सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular