‘एक पेड मां.बाप के नाम’ पर्यावरण रक्षणाची सर्वांची जबाबदारी! संस्थापक अध्यक्षांच्या वाढदिवसाच्या औचित्याने वृक्षारोपण
आसेमं संघटनेचा
वृक्ष संपदेचा ध्यास
रावेर (प्रतिनिधी)मुबारक तडवी
पर्यावरण समतोल राखण्यासाठी प्रयत्न करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, या जाणिवेतून “वृक्षसंपदेचा ध्यास”हा ब्रीद वाक्य अंगीकारत
पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, या जाणिवेतून आसेमं आदिवासी सेवा मंडळ
या सामाजिक संस्थेमार्फत ‘ एक पेड मां बाप के नाम’ या उपक्रमाचे आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू बिर्हाम तड़वी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये कडूनिंब करंज, कांचन, जांभूळ, शीसम, फापडा, धावडा, उंबर, गुलमोहर, मोह, चिंच, चिंच, बेहडा, बांबू, वड, इत्यादी देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले वृक्षांचे वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आले.
आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटना गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत आहे.
🌳 एक पेड मॉं के नाम🌳
या शालेय उपक्रमाअंतर्गत जि.प.शाळा-चिंचाटी ता. रावेर येथे आसेमं संस्थापक मा.राजु बिऱ्हाम तडवी यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त शाळेला 55 वृक्ष भेट देण्यात आले.शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना एक झाड देऊन, वृक्ष लागवडीसाठी खड्डे व रस्त्याच्या कडेला जागा ही मा.राजु बिऱ्हाम तडवी सरांनी उपलब्ध करून दिली. गावाच्या प्रवेशद्वाराच्या रस्त्यालगत शोभा वाढेल या अनुषंगाने वृक्षारोपण मुलांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक वृक्षाला “एक पेढ मॉं के नाम”या उपक्रमात आई वडिलांचे नावा सोबत विद्यार्थ्याचे नाव देऊन, नावाचा फलक लावण्यात येणार आहे. जेणेकरून सर्व कुटुंब त्या वृक्षाची देखभाल व सांगोपण करेल हि अपेक्षा. मा. राजु बिऱ्हाम तडवी सरांनी वयाच्या 50 व्या वर्षापासून हा उपक्रम सुरू केलेला आहे. आजतागायत 615 वुक्ष लावत 100% जगविले आहेत. उर्वरित आयुष्य याच प्रमाणे उपक्रम सुरू राहील हि संकल्पना त्यांनी सर्वांन समोर मांडली.
“एक पेड मां बाप के नाम ” ही संकल्पना पर्यावरण आणि भावनिक जाणीवा यांचा अनोखा संगम ठरणार आहे. या अनोख्या आणि प्रेरणादायी उपक्रमाला सर्व वृक्षप्रेमींनी, निसर्गप्रेमींनी, सामाजिक संस्थांनी विशेष तरुण नव युवकांनी अशा उपक्रमांना प्राधान्य द्यावे आणि हिरारीने सहभागी व्हावे असे आवाहन आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू बिर्हाम तड़वी यांनी यावेळी केले