Wednesday, September 3, 2025
Wednesday, September 3, 2025
Wednesday, September 3, 2025
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeUncategorizedउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने...

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या ६६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत “झाड माझ्या दादाचं” उपक्रमांतर्गत ५०१ रुक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच यावल ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आला.
आपल्या कणखर, गतिमान व प्रभावशाली नेतृत्वाचा वाढदिवस “जनविश्वास सप्ताह” म्हणून संपूर्ण रावेर लोकसभेत विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करणार असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी सांगितले सोबतच लाडक्या बहिणींची, शेतकऱ्यांची, विद्यार्थी व महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकांना न्याय देणारे अजित दादा पवार लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतील असा विश्वास देखील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यावल तालुकाध्यक्ष रितेश पाटील, यावल शहर अध्यक्ष राजेश करांडे, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र सोनवणे, विद्यार्थी यावल तालुकाध्यक्ष गौरव भोईटे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सचिव विलास भास्कर, सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष विलास अडकमोल, कदीर खान, शेख इरफान, कामराज घारू, विक्की गजरे, रामचंद्र नरवडे, सकलीन शेख, सागर सोनवणे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular