अमळनेर :- येथे ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित आदिवासी बांधवांच्या मिरवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य व मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद आरिफ भाया यांनी पारधी समाजाचे प्रख्यात नेते समशेर सिंग यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी आदिवासी समाजाचे नेते संजय पारधी, धनराज पवार, भरत चिंदा पवार, राहुल भिल, राधा बाई पवार, दाझा ताई पवार, बल्ली पवार, समाधान पारधी,राजु पवार,सह आदि बांधव उपस्थित होते
तसेच या प्रसंगी आरिफ भाया यांनी समाजातील बंधुता, एकता व परस्पर आदर यांचे महत्त्व अधोरेखित करत “एकतेतच आपली ताकद आहे” असा संदेश दिला.
मिरवणुकीत विविध समाज घटकांनी उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या बांधवांनी शहरात भव्य मिरवणूक काढली.