अमळनेर : येथील पोलिस ठाणे हद्दीत सरु असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करणे याबाबत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया विभाग उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे यांनी पोलीस निरीक्षक निकम यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती. मात्र अवैध धंदे न झाल्याने उद्या मैराळे यांचे उपोषण होणार आहे.
अमळनेर हे प्रतिपंढरपुर, मंगळ ग्रह मंदीर तसेच साने गुरुजीची कर्मभुमी असून अमळनेर शहरात सध्या अवैध धंद्यांना जोर पकडला आहे यात सट्टे, दारु, गुटखा जुगार येव्हढेच नव्हे तर गांजा देखील विक्री होत आहे. सदर अवैध धंदे पोलिसांच्या आशिवादाने हे सर्व सुरु आहे अशी चर्चा अमळनेर तालुक्यात आहे. यामुळे पोलिस विभागाची व अमळनेर तालुक्याची प्रतिमा डागाळू नये म्हणून अमळनेर पोलिस ठाणे अख्यारीत सुरु असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करावीत व संबंधीतांवर कारवाई करावी अन्यथा १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र्य दिनी या विरोधात उपोषण करण्यात येईल, अश्या आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ समाधान मैराळे यांनी अमळनेर पोलीस निरीक्षक यांना देऊनही कारवाई न झाल्याने उद्या 15 रोजी उपोषण होणार आहे. तहसील कार्यालय आवारात हे उपोषण 9:30 वाजल्यापासून सुरू होईल अमळनेर मधील बुद्धिजीवी लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. मैराळे यांनी केले आहे.
प्रतिक्रिया…
दिनांक 4 ऑगस्ट रोजी अवैध धंदे बंद व्हावीत यासाठी निवेदन दिले होते. मात्र यावर काहीही कारवाई झाली नसल्याने उद्या तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण होणार आहे. म्हणून अमळनेर येथील बुद्धिजीवी मंडळींनी पाठिंबा द्यावा ही विनंती.
डॉ. समाधान मैराळे.
म.रा.पत्रकार संघ (इले.मीडिया)
विभागीय अध्यक्ष