अमळनेर :- अमळनेर को.ऑपरेटिव्ह अर्बन बँक तर्फे शतक महोत्सवी वर्षानिमित्त गरीब गरजू रुग्णासाठी आरोग्य साधनांचे लोकार्पण व सभासद पाल्यांचा भव्य गौरव समारंभ बँकेच्या सर्वसाधारण सभेत उत्साहात संपन्न झाला. शतक महोत्सवी वर्षानिमित्त १० टक्के लाभांश देण्यासह संचालक मंडळाचा अभिनंदन ठराव इंदिरा भवन येथे उत्साहात संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित सभासदांनी मंजूर केला.
सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे हे होते. बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांनी केलेल्या प्रास्ताविकात, शतक महोत्सवी वर्षात बँकेतर्फे सहकार मंत्री यांचे उपस्थितीत झालेला भव्य सभासद,ग्राहक मेळावा, समग्र आरोग्य तपासणी शिबिर, विद्यार्थी गुणगौरव समारंभ,बँकेचे इमारतीचे भव्य नूतनीकरण,विविध नविन आर्थिक योजनांसह विविध समाजोपयोगी उपक्रम व सर्वाधिक व्याजदर देणारी “अमृत धनसंचय १००” योजनेबाबतची माहिती दिली.शतक महोत्सवी वर्षानिमित्त अजेंडा वर नमूद असलेला सभासद लाभांश ९ टक्के ऐवजी जाहीर केल्याप्रमाणे १० टक्के करण्यात यावा अशी मागणी दिलीप ठाकूर यांचेसह उपस्थित सभासदानी केली.सदर लाभांश १० टक्के करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.
सभेचे अध्यक्ष व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांनी अमळनेर को.ऑपरेटिव्ह अर्बन बँक तर्फे शतक महोत्सवी वर्षानिमित्त गरीब गरजू रुग्णाच्या सेवा सुविधेसाठी मेडिकल बेड ,अपंग व्हील चेअर, वॉकर तसेच वॉटर बेड यासह आवश्यक आरोग्य साधनांचे लोकार्पण करीत असल्याचे यावेळी जाहिर केले.जेष्ठ संचालक पंडित चौधरी यांनी आभार मानले.याप्रसंगी बँकेच्या सभासदांच्या १० वी ,१२ वी ७५% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या गुणवंत पाल्यांचा गौरव बँकेतर्फे भेटवस्तू देवून ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आला. सभेचे संचलन व्यवस्थापक अमृत पाटील यांनी केले.यावेळी जेष्ठ संचालक प्रविण जैन, मोहन सातपुते, भरत ललवाणी, लक्ष्मण महाजन,प्रदिप अग्रवाल, दिपक साळी,अभिषेक पाटील, प्रविण पाटील,सौ.वसुंधरा लांडगे,डॉ. मनिषा लाठी, ॲड.व्ही.आर. पाटील, ॲड.विजय बोरसे ,बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
सदर सभेत सभासद सोमचंद संदांनशिव, दिलीप ठाकूर,पी वाय पाटील,प्रफुल भदाणे,उमाकांत नाईक, एस टी पाटील, गुलाब महाजन आदि सभासदांनी बँकेच्या शाखा काढाव्यात , शतक महोत्सवानिमित्त सभासदांना विशेष भेट वस्तू द्यावी यासह विविध सूचना मांडल्या. सभेच्या प्रारंभी बँकेच्या ज्ञात,अज्ञात दिवंगत सभासद व बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे यांचे पिता तथा बँकेचे माजी चेअरमन स्व.गोविंद मुंदडे यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्वसाधारण सभेच्या यशस्वीतेसाठी बँकेचे कर्मचारी वृंद, पिग्मी एजंट यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.