रिपोर्टर नूरखान
सभेत चिठ्ठीद्वारे आरक्षण सोडत प्रक्रिया पार; १० वर्षीय विद्यार्थ्याच्या हस्ते आरक्षण निश्चित.
अमळनेर :- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आदेशानुसार आज अमळनेर येथे पंचायत समिती क्षेत्रातील विविध गणांचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग व महिला प्रवर्गासाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. नगर परिषद सभागृह, अमळनेर येथे पार पडलेल्या या विशेष सभेचे अध्यक्षस्थान उपजिल्हाधिकारी पुनर्वसन तथा सोडत सभा अध्यक्ष संजय बागडे यांनी भूषवले.
या सोडत प्रक्रियेसाठी तहसिलदार तथा प्राधिकृत अधिकारी रुपेशकुमार सुराणा, निवडणूक नायब तहसिलदार प्रशांत धमके, महसूल नायब तहसिलदार अजय कुलकर्णी, अ.का. श्रीमती. रुपाली अडकमोल यांच्यासह निवडणूक शाखेतील कर्मचारी श्री. प्रदीप महाले, श्री. किशोर साळुंके, श्री. सचिन निकम व श्री. अक्षय सातपुते हे उपस्थित होते.
आकर्षण ठरले ते सोडत प्रक्रिया १० वर्षीय कु. विराट शुभम शिंदे याच्या हस्ते पार पडल्याचे. चिठ्ठी पद्धतीने आणि चक्रानुक्रमे आरक्षण ठरवण्यात आले.
आरक्षणाचा तपशील पुढीलप्रमाणे.
अ. क्र. गणाचे नाव आरक्षण प्रकार.
1) कळमसरे अनुसूचित जमाती (महिला)
2) प्र. डागंरी अनुसूचित जमाती
3) अमळगांव नागरिकांचा मागासवर्ग
4) पातोंडा अनुसूचित जाती (महिला)
5) दहिवद सर्वसाधारण
6) सारबेटे बु सर्वसाधारण
7) मुडी प्र.डा सर्वसाधारण (महिला)
8) मांडळ मागासवर्ग (महिला)
9) मंगरुळ सर्वसाधारण (महिला)
10) जानवे सर्वसाधारण
सदर आरक्षण प्रक्रिया पूर्णत, पारदर्शक पद्धतीने व शांततेत पार पडली. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी अधिक ठोस होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.