Sunday, August 31, 2025
Sunday, August 31, 2025
Sunday, August 31, 2025
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeMarathiअमळनेर नगरपरिषदेतर्फे भव्य तिरंगा रॅली – देशभक्तीच्या उन्मेषाने निनादले शहर!

अमळनेर नगरपरिषदेतर्फे भव्य तिरंगा रॅली – देशभक्तीच्या उन्मेषाने निनादले शहर!

अमळनेर :- तालुक्यातील “हर घर तिरंगा अभियान – 2025” अंतर्गत अमळनेर नगरपरिषदेतर्फे दि. 14 ऑगस्ट रोजी शहराच्या इतिहासातील एक भव्य आणि अविस्मरणीय तिरंगा रॅली काढण्यात आली. राज्य शासन व नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रॅलीने संपूर्ण अमळनेर देशभक्तीच्या स्वरांनी दुमदुमून निघाले.

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथून 900 मीटर लांबीच्या तिरंगा ध्वजासह रॅलीचा शुभारंभ मा. स्मिताताई वाघ, खासदार जळगाव लोकसभा यांच्या हस्ते करण्यात आला. देशभक्तीपर गीतांच्या गजरात, विद्यार्थी, नागरिक, पदाधिकारी व अधिकारी यांच्या उस्फूर्त सहभागाने रॅली स्टेशन रोड मार्गे तिरंगा चौकापर्यंत पोहोचली. तेथे राष्ट्रगीत व राज्यगीताच्या ध्वनिफितीवर राष्ट्रध्वजास मानवंदना देत कार्यक्रमाचा भव्य समारोप झाला.

यावेळी आयोजकांकडून सर्व सहभागींस स्वच्छतेची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे यश हे नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्तम समन्वयाचे फलित ठरले.

मा. खासदार स्मिताताई वाघ यांनी आपल्या प्रभावी भाषणातून सर्वांना देशभक्तीची जाणीव करून देत सांगितले की, “नागरिक म्हणून आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडून, तिरंग्याबद्दलची निष्ठा व देशाचा स्वाभिमान सदैव अबाधित ठेवणे हेच आपले सर्वोच्च ध्येय असावे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर अभियंता डीगांबर वाघ व पत्रकार संजय पाटील यांनी केले. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

या प्रसंगी मा. खासदार स्मिताताई वाघ, मा. सौ. भैरवीताई वाघ-पलांडे, मा. डॉ. अनिल शिंदे, मा. नितिन मुंडावरे (उपविभागीय अधिकारी, अमळनेर), विनायक कोते (पोलीस अधीक्षक, अमळनेर), मुख्याधिकारी तुषार नेरकर (मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद), दत्तात्रय निकम (पोलीस निरीक्षक, अमळनेर), नेमाडे (महावितरण, अमळनेर) तसेच शहरातील मान्यवर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमळनेरच्या प्रत्येक रस्त्यावरून, प्रत्येक चेहऱ्यावरून आज एकच संदेश घुमत होता –
“तिरंगा आमचा अभिमान, भारत देश आमचा स्वाभिमान!”

या भव्य रॅलीसाठी विशेष परिश्रम घेतलेले अधिकारी व कर्मचारी –
रवींद्र चव्हाण (उपमुख्याधिकारी), सुनील पाटील (स्थापत्य अभियंता), अजित लांडे (स्थापत्य अभियंता), कुणाल महाले (विद्युत अभियंता), सुदर्शन शामनानी (लेखापाल), कृणाल कोष्टी (लेखापरीक्षक), मयूर तोंडे (नगर रचनाकार), सौरभ बागड (नगर रचनाकार), किरण खंडारे (स्वच्छता निरीक्षक), संतोष माणिक (स्वच्छता निरीक्षक), गणेश गोसावी (अग्निशमन अधिकारी), संदीप पाटील (संगणक अभियंता), वैद्यकीय अधिकारी, विलास महाजन व प्रवीण शेलकर, महेश जोशी, श्री. लौकिक समशेर, रोहित रामोळे, कैलास कसाब, विनोद पाटील, प्रवीण बैसाणे, भाऊसाहेब सावंत, चंद्रकांत मुसळे, गणेश गढरी.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular