रिपोर्टर नूरखान
अमळनेर – अमळनेर तहसील कार्यालयाचे एक वेगळेच चित्र समोर येत आहे. सामान्यतः शासकीय कार्यालये रविवारसारख्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद असतात. मात्र, अमळनेर तहसील कार्यालय रविवारी देखील खुले असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.
या अनपेक्षित गोष्टीमुळे नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. “तहसील कार्यालय रविवारी का सुरू असते? कोणती कामे केली जातात?” असा संभ्रम निर्माण झाला आहे.
स्रोतांच्या माहितीनुसार, कार्यालयात रविवारी देखील काही कर्मचाऱ्यांची ये-जा सुरू असते. काहींच्या मते, हे वाळू माफियांशी संबंधित व्यवहारासाठी असू शकते, असा संशय व्यक्त केला जात आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून योग्य चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालय उघडे का ठेवले जाते आणि कोणती कामे केली जातात, याबाबत पारदर्शकता आवश्यक आहे.