रिपोर्टर नूरखान
भारतीय सैन्यदलातील १७ वर्षांची शौर्यगाथा; १ ऑक्टोबरला शहरात भव्य मिरवणूक आणि सत्कार समारंभ.
अमळनेर :- अमळनेर नगरीचे वीर जवान संदानशिव विजय किरण (फौजी) हे भारतीय सैन्य दलात १७ वर्षांची गौरवशाली सेवा पूर्ण करून ३० सप्टेंबर २०२५ रोजी सन्मानपूर्वक सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत तिसरी बटालियन, दि महार रेजिमेंन्ट मध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, पुलवामा सारख्या युद्धजन्य काळात तसेच ऑपरेशन सिंदूर मध्ये सक्रिय सहभाग घेऊन देशसेवा केली आहे. त्यांच्या या अतुलनीय योगदानाबद्दल अमळनेर शहरातर्फे १ ऑक्टोबर रोजी भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
भव्य मिरवणुकीने होणार शहरात आगमन
सेवानिवृत्तीनंतर जवान संदानशिव किरण यांचे दिनांक ०१/१०/२०२५ रोजी अमळनेर शहरात आगमन होत आहे. या वीर जवानाचे स्वागत ऐतिहासिक आणि उत्साहाच्या वातावरणात करण्यासाठी शहरातील नागरिकांनी जय्यत तयारी केली आहे.
सकाळच्या सत्रात सकाळी ९ वाजल्यापासून अमळनेर रेल्वे स्टेशनपासून शहरात भव्य मिरवणुकीचा प्रारंभ होईल. ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात येणार असून, यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या सुपुत्राचा गौरव करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सेवापुर्ती सत्कार समारंभ.
मिरवणुकीनंतर सकाळी १० वाजता शहरात सेवापुर्ती सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात संदानशिव विजय किरण (फौजी) यांचा अमळनेर नगरीतर्फे यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. शहरवासीय, विविध संस्थांचे पदाधिकारी, आणि प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित राहून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतील.
आयोजकांनी अमळनेर शहरातील समस्त नागरिकांना, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि युवकांना या अभिमानाच्या सोहळ्याला सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून वीर जवानाच्या शौर्यगाथेचे साक्षीदार व्हावे, अशी नम्र विनंती केली आहे.
आपले विनीत.
संतोष अभिमन संदानशिव ,किरण अभिमन संदानशिव,
अमृत अभिमन संदानशिव,राजेंद्र अभिमन संदानशिव, विनोद किरण संदानशिव,बापू रवींद्र संदानशिव,श्रावण शामराव संदानशिव
समस्त संदानशिव परिवार अमळनेर.