रिपोर्टर नूरखान
अमळनेर– शिवसेना हा सर्वसामान्य, कष्टकरी व प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष असून, अधिकाधिक लोकांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवण्यासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी सभासद नोंदणी मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश पाटील यांनी केले.
शहरात झालेल्या सभासद नोंदणी बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेना शहरप्रमुख संजय पाटील हे होते. बैठकीस उपजिल्हाप्रमुख महेश देशमुख, महिला तालुकाप्रमुख सुरेखा पाटील, महिला शहरप्रमुख चित्रकला महाजन यांनी मार्गदर्शन करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
या बैठकीस युवा सेना तालुकाप्रमुख गुणवंत पाटील, उपतालुकाप्रमुख सुभाष पाटील, भूषण कोळी, संतोष पाटील, महेश पाटील, विनोद बोरसे, सोमेश्वर पाटील, उपशहरप्रमुख शिवदास पाटील, व्यापारी आघाडी प्रमुख अमित जैन, अल्पसंख्याक आघाडी प्रमुख शोएब शेख, प्रसिद्धी प्रमुख अनिल पाटील, रविंद्र पाटील, विजय पाटील, भगवान पाटील, ऋषिकेश पाटील, राजेंद्र पाटील, दीपक हटवाल, गजेंद्र राठोड, रामेश्वर, लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील, संतोष महाजन, अरुण महाजन, आधार कोळी, रिजवान खान यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन उत्तम प्रकारे पार पडले असून, शिवसेनेची संघटनात्मक घडी अधिक मजबूत करण्यासाठी ही सभासद नोंदणी मोहीम महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.