जळगाव @wahid kakar
जिल्ह्यात अलीकडील घडलेल्या घटनांमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येत असल्याचे सांगत विविध संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे दोषींवर कडक कारवाई साठी निवेदन सादर केले. या प्रसंगी जनक्रांति मोर्चा चे अध्यक्ष मुकुंद सपकाळे,माजी उपमहापौर डॉ. अब्दुल करीम सालार, मराठा सेवा संघ चे विभागीय अध्यक्ष राम पवार, माराठा सेवा संघ चे उपाध्यक्ष सुरेंद्र पाटील, सुन्नी मरकज ए जामा मस्जिदचे सय्यद अयाज अली, ईदगाह ट्रस्टचे सचिव अ. अजीज सालार, बागवान बिरादरीचे खालिद बागवान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे फिरोज शेख, काँग्रेस महानगराध्यक्ष अमजद पठाण, शाहिद मेम्बर, पटेल- देशमुख- देशपांडे बिरादरीचे युवा अध्यक्ष शाहिद पटेल, इरफान सालार, कुरेशी बिरादरीचे अध्यक्ष इब्राहिम कुरेशी, शेख राशीद, इरफान खान, सोमा भालेराव, साहेबराव वानखेडे, सुरेश तायडे, प्रा. प्रीतीलाल पवार, चंदन बिऱ्हाडे, अफझल खान, राजिक पटेल, सईद पटेल, महेंद्र केदारे, जमील शेख, अल्लाबक्ष बागवान, नईम शाह, खुशाल चव्हाण, दिलीप सपकाळे, जाहिद शाह, रईस कुरेशी, फारुख कादरी, इस्माईल खान, मोहम्मद जहूर, याकूब खान, शफी ठेकेदार यांची उपस्थिती होती.
संघटनांनी दिलेल्या निवेदनात –
जामनेर, यावल, हिगोंणा व रावेर येथील अलीकडील घटनांची निष्पक्ष चौकशी, फरार आरोपींना अटक, ओळख परेड व फॉरेन्सिक तपास,स्थानीक पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करून एसआयटीमधून वगळणे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेवर बंदी, यावल व रावेर शहरात सीसीटीव्ही बसवणे, तसेच बेटावद खटल्यासाठी विशेष सरकारी वकील नेमणे वगैरे.
या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
निवेदनाद्वारे संघटनांनी प्रशासनाला सांगितले की, जिल्ह्यात शांतता व सलोखा टिकावा यासाठी आम्ही सदैव सहकार्य करतील, मात्र दोषींवर कठोर कारवाई व्हावी.मा.पो. अधिकशक अशोक नखाते यांनी पोलिस निष्पक्ष व कोणाचे ही दबावा खाली काम करणार नाही अशी गवाही दिली